आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीवनाच्या सार्थकतेत रंगांचे महत्त्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मानवाचे दैनंदिन जीवन आणि ज्योतिषात रंगांना खूप महत्त्व असते. होलिकोत्सव आणि धुलीवंदनापाठोपाठ येणा-या फाल्गुन कृष्ण पंचमीला रंगपंचमी साजरी केली जाते. यंदा हा सण रविवारी (31 मार्च) साजरा होतोय. या सणानिमित्त आपण रंगांचे महत्त्व जाणून घेऊया...


निसर्गात अनेक रंग दडलेले आहेत. आपल्या दैनंदिन कामावर त्यांचा थेट परिणाम होतो. सूर्यकिरणांमध्ये सात रंग सामावलेले असतात. यामध्ये तीन रंग प्रमुख आहेत - लाल, निळा आणि पिवळा. या तीन रंगांना त्रिमूर्ती म्हटले जाते. याच मूळ रंगांच्या मिश्रणातून नारंगी, जांभळा, हिरवा आदी इतर सर्व रंग तयार होतात. सूर्यप्रकाशानेच आपल्याला ऊर्जा मिळत असल्याने या रंगाचा आपल्या जीवनावर थेट प्रभाव पडतो. सूर्यमालेत सूर्य वगळता प्रत्येक ग्रहाचा स्वत:चा एक रंग आहे. ज्याप्रमाणे सूर्यात हे सर्व रंग असतात, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातही हे सर्व रंग असतात. सूर्यातून बाहेर पडलेले रंग आपण योग्य प्रमाणात ग्रहण केले नाहीत, तर अनेक प्रकारचे शारीरिक तसेच मानसिक आजार उद्भवू शकतात.


रंगांचे व्यवस्थापन का आवश्यक
मानवाच्या जन्माच्या वेळी ग्रहस्थिती निरनिराळी असते. त्या वेळी जो ग्रह पृथ्वीपासून दूर असेल, त्या रंगाचा प्रभाव मानवावर कमी होतो. जातक तो रंग योग्य प्रकारे ग्रहण करू शकत नाही
आणि चित्त विचलित होते. अशा स्थितीत त्यास योग्य निर्णय घेता येत नाहीत आणि नुकसान होते. म्हणून सूर्याकडून मिळणारे रंग आणि आपल्या शरीरात असलेले रंग यांचा ताळमेळ साधणे आवश्यक आहे.


रंगांचा जीवनावर प्रभाव
लाल । हा मंगळ आणि सूर्याचा रंग आहे. तो उष्णता आणि उत्तेजनेत वाढ करतो. मंगळ हा जातकाच्या रक्तात मिसळून राहतो. मंगळाच्या दुष्परिणामांमुळे रक्त, मज्जा आणि मांसाशी निगडित रोग होऊ शकतात. लग्न जमण्यात अडचण, राग येणे, आळस, हे सर्व लाल रंगामुळे होते. हा रजोगुणी रंग आहे.
पिवळा । हा रंग धर्माचे प्रतीक आहे. गुरू ग्रहाचा हा रंग शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये असतो. याच्या प्रभावाने जातक धार्मिक, सात्त्विक, सदाचारी होतो. हा रंग सत्त्वगुणी असतो.
निळा । हा रंग शनी, राहू, केतूचे प्रतिनिधित्व करतो. यामध्ये क्रौर्य सामावलेले असते. हा रंग न्यायाचे प्रतीक आहे. हा रंग रात्री शांत आणि दिवसा उग्र असून तमोगुणी असतो. शनीची साडेसाती किंवा अडीच वर्षांच्या काळात या रंगाचे कपडे वापरू नयेत.
हिरवा । हा रंग बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो. विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम रंग आहे.
जांभळा । हा रंग शनीचे प्रतिनिधित्व करतो. सिनेमा, न्यायालय, लेखन या क्षेत्रात हा रंग यश मिळवून देतो. सर्व प्रकारच्या कलाकारांना हा रंग शुभ फल प्रदान करतो. याच रंगाच्या प्रभावामुळे व्यक्ती कलाकार बनते.
निळसर जांभळा । हा रंगही शनीचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून तो न्यायसंगत असल्याचे मानतात. विरोधकांना नामोहरम करण्याची क्षमता या रंगात असते.
केशरी । हा रंग दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व करतो. यामधून आशा व्यक्त होते. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो. या रंगाच्या वापराने नैराश्य दूर होते.
याव्यतिरिक्त असलेले काळा, पांढरा आणि पारवा या तीन रंगांचा प्रभाव इतर रंगांपेक्षा निराळा आहे.
काळा । हा तामसी प्रवृत्तीचा रंग आहे. अंधार आणि अपमानाचे प्रतीक आहे. असत्य, अपवित्रता आणि राक्षसी प्रवृत्तीचा कारक आहे. हा रंग परिधान करणारे सत्य दडवून ठेवतात.
पांढरा । हा रंग पावित्र्य, शुद्धता, समेट, शांतता प्रदान करणारा आहे. सत्य, शुद्धी आणि दयेचा कारक आहे. हा रंग वापरणारी व्यक्ती शांत स्वभावाची, विनम्र आणि ज्ञानी असते.
पारवा । हा रंग भीती, दु:ख आणि पळपुटेपणाचे प्रतीक तसेच नैराश्यसूचक आहे. हे तिन्ही रंग सूर्यकिरणांमध्ये नसतात.
राशीनुसार
वापरा रंग
मेष आणि वृश्चिक
लाल, केशरी
वृषभ आणि तूळ
पांढरा, चमकदार, मिथुन आणि कन्या हिरवा
कर्क
पांढरा शुभ्र
सिंह
लाल
धनू आणि मीन
पिवळा, केशरी
मकर आणि कुंभ
निळा, आकाशी
रंगांच्या साहाय्याने उपचार
विविध रंग स्वच्छ पाण्यात मिसळा आणि काचेच्या बाटल्यांमध्ये भरून एक दिवस सूर्यप्रकाशात ठेवा. काचेतून थेट रंगात मिसळणा-या सूर्यप्रकाशाचा रंगीत पाण्यावर परिणाम होतो. विविध आजारांवर उपचारात हे रंगीत पाणी उपयोगी ठरते.
हिरवा : हा रंग कर्करोग, नपुंसकता, ताप तसेच कंबरदुखी दूर करतो. अल्सर तसेच गुप्तरोगांवरील उपचारांतही हा रंग लाभदायक आहे.
पिवळा : सूज कमी करण्यासाठी हा रंग उपयोगी असतो. यकृत किंवा पोटाच्या विकारात लाभदायक. शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करतो. मुरुमे-खीळ यावरही गुणकारी.
लाल : रक्ताशी निगडित आजार तसेच रक्ताल्पता हे रोग दूर करतो. हृदयाशी संबंधित आजारांवर लाभदायक.
निळा : मेंदूविकार, ताप आदी आजारांवर गुणकारी. कोणत्याही प्रकारच्या वेदनांवर गुणकारी.
जांभळा : पोटाचे विकार दूर होतात, तसेच मज्जासंस्था सुरळीत राहते.
पोशाखातही रंगांचे महत्त्व
सर्वसामान्यांनी बहुतांश पांढरे कपडे परिधान करावेत. कफाचा त्रास असलेल्या व्यक्तीने लाल कपडे परिधान करावेत. पोट साफ न होणे किंवा यकृताचा आजार असलेल्यांनी पिवळी वस्त्रे वापरावीत. ज्या लोकांना खूप आळस येतो, त्यांनी लाल कपडे घालावेत. त्वचाविकार असलेल्यांनी काळे किंवा चितकबरे कपडे घालावेत. निळी पगडी किंवा टोपी घालावी. यामुळे सूर्याच्या उष्णतेचा परिणाम होत नाही. डोकेदुखी तसेच इतर सर्व रोगांपासून रक्षण होते.
शुभ मुहूर्त
० सूतिका स्नान, रंग पंचमी
(सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत)
31 मार्च : रविवार
० शीतला पूजन
(सूर्योदयापासून सकाळी 11 वाजेपर्यंत)
2 एप्रिल : मंगळवार
० अन्नप्राशन, दशामाता पूजन, नांगरणी
(सूर्योदयापासून सकाळी 10.15 व दुपारी 12.05 ते 13.15 पर्यंत)
5 एप्रिल : शुक्रवार
व्रतवैकल्ये
० 31 मार्च रंगपंचमी
इस्टर संडे
० 1 एप्रिल नाथषष्ठी
० 2 एप्रिल शीतळा पूजन
० 3 एप्रिल कालाष्टमी
० 5 एप्रिल सिंधी स्वामी
लीलाशाह
जन्मोत्सव
० 6 एप्रिल पापमोचनी
एकादशी


वास्तुमंत्र
शयनकक्षाच्या दारासमोर पलंग नसावा. अशाप्रकारे पलंग असेल, तर कुटुंबात कलह निर्माण होतात. बदल करणे शक्य नसल्यास, शयनकक्षाच्या दारावर पडदा लावून हा आंशिक दोष दूर करता येतो.
शयनकक्षाच्या दक्षिणेकडील भिंतीवर आकर्षक चित्र लावावे किंवा फिक्या लाल किंवा पिवळ्या रंगाचा दिवा लावावा. असे केल्याने पती-पत्नीमध्ये वैचारिक सामंजस्य निर्माण होते.