आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सृजनशील: फक्त महिलांनाच स्टार्टअपसाठी निधी देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेनेता कूपर, एंजल इन्व्हेस्टर
वय - ५०
कुटुंब - पती टीम कूपर, दोन मुले
चर्चेत - महिलांच्या स्टार्टअप्ससाठी त्यांनी नुकताच ५ लाख डॉलर्सचा निधी उभारला आहे.

शरणार्थीच्या रूपात ऑस्ट्रेलियात आल्या तेव्हा हाती फक्त १९ डॉलर होते.
रेनेता स्लोव्हाकच्या शरणार्थीच्या रूपात ऑस्ट्रेलियात राहायला आल्या. त्यामुळेच आयुष्यातील प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी त्या सरसावल्या. वयाच्या २० व्या वर्षी सिडनीत फूल विकण्याची पहिली नोकरी मिळाली. त्यांच्या कामाने प्रभावित होत मालकाने रेनेता यांना व्यवस्थापक बनवले. काही दिवसांनंतर एका बुटीक स्टोअरमध्ये व्यवस्थापकाचे काम मिळाले. इंग्रजी कशीबशी यायची, परंतु ग्राहकाची मागणी नीट समजून घ्यायच्या. त्याच वेळी काही अभ्यास केला आणि एका वकिलासोबत काम करण्याची रेनेता यांना संधी मिळाली. हे वकील बौद्धिक संपत्ती कायद्याचे काम करायचे. येथेच रेनेता यांना रणनीती आखून कसे काम करायचे हे शिकायला मिळाले. त्यानंतर थोडा पैसा जमल्यानंतर एक स्टार्टअप सुरू केले. काही दिवसांनी ते अमेरिकेच्या एका कंपनीला विकून टाकले. दरम्यान, त्यांच्या खासगी आयुष्यात खूप अडचणी आल्या. लग्नानंतर दहा वर्षांपर्यंत मूलबाळ झाले नाही. पाच वेळा गर्भपात झाल्याने पूर्णपणे खचल्या. त्याच वेळी त्यांचे पती आपला व्यवसाय जगभरात सुरू करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे त्यांना मूलबाळ आणि पती या दोघांकडूनही अपेक्षित सुख-समाधान मिळत नव्हते. मात्र, नंतर त्यांना हे कळून चुकले की स्टार्टअपच्या जगात टिकण्यासाठी हे सहन करावे लागणारच. रेनेता सांगतात, दहा वर्षांनंतर पहिल्यांदा गोड वार्ता मिळाली आणि आता दोन मुले आहेत. आयुष्यात अनेक प्रकारचे लोक भेटले. त्यापैकी काही मेलबर्न आणि सिडनीतील मातब्बर मंडळीही होती. मात्र, ऑस्ट्रेलियातील कायद्यानुसार हाय नेटवर्थचे लोक व्हेंचरक्राऊडमध्ये पैसा गुंतवू शकत नाही. नेमका याचाच फायदा रेनेता यांना झाला. जगात पहिली संधी मिळणे किती कठीण असते याची रेनेता यांना जाणीव आहे. म्हणूनच त्यांनी महिलांच्या मदतीसाठी २०११ मध्ये फॉर्मिंग सर्कल्स फंड सुरू केले. ज्यांना टेक्नालॉजी स्टार्टअप्सची सुरुवात करायची आहे त्यांना या फंडातून मदत केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...