आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीशक्तीः डीनला समजावल्यावर मिळाला प्रवेश!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनीता गुप्ता, सीईओ, लुपिन
-जन्म -१९६८
-शिक्षण - मुंबई विद्यापीठातून फार्मसीमध्ये पदवी आणि अमेरिकेच्या जेएल केलॉग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए.
-कुटुंब - वडील- देशबंधू गुप्ता, पती बृज शर्मा (अमेरिकेत व्यावसायिक), मुलगा - कृष (९ वर्षे)
चर्चेत - त्यांची कंपनी लुपिनने अमेरिकेत गेविस ५६०६ कोटी रुपयांत खरेदी केली.
वडिलांप्रमाणे त्याही पाच भाऊ-बहिणींत थोरल्या असून भावासोबत कंपनीचे कामकाज सांभाळतात.
९ वर्षांचा कृष आपली आई विनीतासमवेत ऑफिसमध्ये येत असतो. लहानपणी प्रोफेसर वडिलांनी स्थापन केलेल्या कंपनीत विनिता ज्याप्रमाणे जात होत्या तसा कृष त्यांच्यासोबत येतो. कंपनी चालवण्यासाठी कशा पद्धतीने काम करावे लागते हे पाहण्यासाठी १३ व्या वर्षी त्या वडिलांसमवेत स्वित्झर्लंडमध्ये गेल्या होत्या.

कंपनीत चर्चा कशा पद्धतीने केली जाते, धोरण कसे ठरवले जाते. एखाद्याला आपले म्हणणे ऐकण्यासाठी कसे तयार केले जाते या गोष्टी तेव्हा त्या शिकल्या. २० व्या वर्षी त्यांनी केलाॅगमध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांनी वयाने लहान असले तरी आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो हे त्यांनी समजावून सांगितले. वर्गात त्या सर्वात लहान होत्या. पती बीपीओ आंत्रप्रेन्युअर असून ते अमेरिकेत राहतात.

या कंपनीची सुरुवात आणि त्यांचा जन्म एकाच वर्षी झाला. १९६८ मध्ये देशबंधू गुप्ता यांनी पत्नीकडून ५ हजार रुपये घेऊन लुपिनची सुरुवात केली. लुपिनचा अर्थ आहे वाळवंटातही उगवू शकणारे फूल. सुरुवातीस केवळ जीवनसत्त्वाच्या गोळ्या तयार करणाऱ्या या कंपनीने तेव्हा टीबीवरील औषधांवर काम करण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण जगात लौकिक मिळवला.
दोन वर्षांपूर्वी बिट्स पिलानीमध्ये प्रोफेसरपदी कार्यरत गुप्ता यांनी कंपनीचे दैनंदिन कामकाज मुलगी आणि मुलगा नीलेशवर सोपवले आहे. त्यांना आणखी तीन कन्या आहेत, मात्र त्या व्यवसायात लक्ष देत नाहीत. विनीता यांनाही वडलांप्रमाणे पाच बहीण-भाऊ आहेत. विनीता १९९२ मध्येच कंपनीचे कामकाज पाहत होत्या. कंपनीने मागील शतकापर्यंत जागतिक बाजारपेठेत विशेष कामगिरी बजावली नव्हती. मात्र, त्यानंतर कंपनीची जोरदार वृद्धी झाली.
अमेरिकेत या कंपनीने सन फार्मा आणि डॉ. रेड्डी यांच्यानंतर प्रवेश केला.
मात्र, यानंतर लगेच लहान मुलांसाठी प्रतिजैविके तयार करणारी अमेरिकी कंपनी सुप्राक्स विकत घेतली.
विनीता सध्या संपूर्ण जगातील कंपन्यांचे काम पाहत असून नीलेश घराची आघाडी सांभाळतात. पुण्यात संशोधनकार्य करणाऱ्या १५० शास्त्रज्ञांच्या टीमचे ते प्रमुख आहेत. कंपनीने प्रतिजैविकापासून ओरल कॉन्ट्रासेप्टिकपर्यंत जेनरिक औषध निर्मिती करत आहे. त्यासाठी विनीता यांच्या वडिलांना जेनरिक गुरू संबोधले जाते. अमेरिकेशिवाय एक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जपानमध्येही २००७ ते २०११ पर्यंत त्यांनी दोन कंपन्या खरेदी केल्या. भारत आपल्या कामातून परदेशातही औषध निर्माण क्षेत्रात लौकिक मिळवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...