आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळेपण: लष्करासारखी शिस्त, कंपनीतही ड्रेस कोडच्या उल्लंघनावर दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेंग जियानलिन, बिझनेसमन
जन्म - १९५४
शिक्षण - लियोनिंग विद्यापीठातून पदवी
कुटुंब - पत्नी ली निंग, मुलगा वेंग सिकोंग(२७)
चर्चेत - नुकतेच त्यांना चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती जाहीर केले. त्यांनी अलिबाबाच्या जॅक मा यांना मागे टाकले आहे.
वेंग यांचे वडील माओ जेडाँग रेड आर्मीमध्ये होते. त्यांचा प्रभाव वेंग यांच्यावरही पडला. पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये ते १६ वर्षे सैनिक होते. निवृत्तीनंतर त्यांनी कार्यालयीन अधीक्षक म्हणून काम सुरू केले. यानंतर हळूहळू ते डेलियन वांडा ग्रुपमध्ये जनरल मॅनेजर झाले. चीनमध्ये उदारीकरणाच्या काळात सरकारजवळ जायचे, पण राजकारणापासून दूर राहण्याचे त्यांनी ठरवले. वेंग यांनी रिअल इस्टेटमध्ये पैसा गुंतवण्यास सुरुवात केली. यामुळेच ते १९९३ मध्ये डेलियन वांडा ग्रुपचे सीईओ झाले. लष्कराची पार्श्वभूमी असल्यामुळे द इकॉनॉमिस्टने त्यांना ए मॅन ऑफ नेपोलियन अॅम्बिशन ठरवले आहे. सीमा गार्डवरून त्यांना रेजिमेंटच्या कमांडर पदापर्यंत बढती मिळाली. त्यांनी लष्करातील शिस्त कंपनीतही लागू केली. त्यांच्या कंपनीचा ड्रेस कोड आहे. एखाद्याने त्याचे उल्लंघन केल्यास त्याची शिक्षा मिळते. जगातील सर्वात मोठी सिनेमा चेन त्यांच्याच मालकीची आहे.

चीनचे सर्वात मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर तेच आहेत. चीनमधील अनेक प्रतिष्ठित कुटुंबांना आपल्या व्यावसायिक मालमत्ता, रिअल इस्टेट आणि चित्रपट व्यवसायातील शेअर्स ते देत असतात. त्याबदल्यात सरकारमधील अधिकारी जमीन विकसित करण्यासाठी सवलत देतात. २०१४ मध्ये त्यांच्या कंपनीचा पब्लिक इश्यू आला. त्यात सरकारी अधिकारी आणि कुटुंबीयांचा वाटा १.१ अब्ज डाॅलर होता. चित्रपटाच्या व्यवसायात अधिकाऱ्यांनी १ कोटी ७२ लाख डॉलर गुंतवले आहेत. त्यांच्याकडे ५८ शॉपिंग प्लाझा, १५ लक्झरी हॉटेल्स, ५७ डिपार्टमेंट स्टोअर्स, ६००० स्क्रीन्स चीनमध्ये आहेत. गेल्या वर्षी त्यांनी अमेरिकेतील चित्रपट चेन एएमसी खरेदी केली होती. प्रॉडक्शन, स्क्रीनिंग आणि डिस्ट्रिब्युशन चॅनल मोठ्या प्रमाणात असणारी त्यांची जगातील एकमेव कंपनी आहे.
बातम्या आणखी आहेत...