आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्करोग उच्चाटनासाठी मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्करोगाविरोधात कोणत्याही एका नायकाची युद्ध जिंकण्याची शक्यता नाही. हे एक नाही तर शेकडो, हजारो आजारांसारखे आहे आणि कर्करोग कोणत्याही एका विषाणू किंवा जीवाणूंमुळे होत नाही की, ज्यायोगे त्यांना नष्ट केले जाईल. कर्करोग तर जनुके सैरभैर झाल्याने, हारमोन्समधील बदल, पेशींच्या स्वच्छंद वर्तणुकीसारख्या किचकट आणि घातक युतीचा परिणाम आहे. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे मायक्रोबायोलॉजिस्ट फिलिप शार्प सांगतात, या आजाराचा किचकटपणा धक्कादायक आहे. नोबेल पुरस्कारविजेते शार्प कर्करोगाच्या जनुकीय कारणांवर संशोधन करत आहेत. ते मागील चार वर्षांपासून ‘स्टँड अप टू कॅन्सर’ (एसयू2सी) संस्थेच्या मदतीने कार्यरत ड्रीम टीमसह कर्करोगासोबत लढा देत आहेत. अमेरिकेच्या सर्वात जीवघेण्या आजाराविरोधात लढा देण्यासाठी ही संस्था करमणूक उद्योग (हॉलीवूड)ने तयार केली आहे. राष्‍ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटनुसार अमेरिकेत या वर्षात पाच लाख 80350 लोकांना कर्करोगाने मृत्यू येण्याची शक्यता आहे.


एमडी अँडरसन कॅन्सर सेंटरमध्ये एप्लाइड कॅन्सर सायन्स इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. लिंडा चीन यांच्या मते, आता आपण विज्ञान आणि औषधांमध्ये फरक करू शकणार नाहीत. पी 53 नावाचा जनुकीय बदल पेशींच्या मृत्यूला नियंत्रित करतो. हा काही इतर कर्करोगातही दिसून येतो. महिलांना होणारा कर्करोग जसे, स्तन आणि अंडाशयात बीआरसी-1 म्युटेशन आढळून येतो. तरीही या दोन आजारांवरील उपचार आणि संशोधन वेगवेगळे केले जाते. यामुळे संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेच्या कार्यपद्धतीला बदलले जाऊ शकते. या प्रकरणात सेलिब्रिटी आणि मोठा निधी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. स्पायडरमॅनच्या निर्मात्या लारा जिसकिन ज्या 2011 मध्ये स्तनाच्या कर्करोगाशी सुरू असलेला जीवनाच्या संघर्षात पराभूत झाल्या.


कॅटी कॉरिक ज्यांच्या पतीचा 1998 मध्ये स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू झाला आणि पॅरामाउंट पिक्चर्सचे माजी सीईओ शॅरी लानसिंगसह काही लोकांच्या पथकाने 2008 मध्ये कर्करोगावर हल्ला चढवण्यासाठी एसयू2सीची स्थापना केली. संस्थेने उपचार आणि विज्ञान जगतातील सर्वात प्रतिभावान लोकांना कर्करोग संशोधनाशी जोडले. त्यांना मोकळ्या हाताने निधी दिला. एसयू2सीकडून एक कोटी 80 लाख डॉलरपर्यंत अनुदान दिले जात आहे. सुरुवातीच्या तीन वर्षांतच परिणाम देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून असते. अमेरिकन कॅन्सर रिसर्च असोसिएशन या प्रकल्पांचे नियंत्रण करण्याचे काम करते. शार्प यांच्या नेतृत्वाखालील एसयू2सीची शास्त्रज्ञांची एक तज्ज्ञ समिती प्रत्येक पथकाच्या कामाची वर्षात दोनदा समीक्षा करते. कर्करोगाच्या उच्चाटनासाठी पथकाचे मॉडेल वैद्यकीय संशोधन संस्थांना प्रभावित करत आहे. तज्ज्ञ आता यशाचे श्रेय एकट्याने लाटू शकणार नाहीत. उपचार संस्थांमध्ये पथक संशोधनाचा अर्थ करार, पॅकेज आणि प्रज्ञावंत अधिकारांतील बदलांच्या रूपात होईल. रुग्णांनाही फायदा होत आहे. एमडी अँडरसन कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष डॉ. रोनाल्ड डिपिन्हो यांनी आठ प्रकारचे कर्करोग फुप्फुस, अष्ठीला (प्रोस्टेट), कृष्णकर्क (मिलानोमा), स्तन, अंडाशय, तीन प्रकारचे श्वेतपेशी (ल्युकेमिया)ला लक्ष्य करण्यासाठी सहा समूहांची स्थापना केली आहे. यांना ‘मून शॉट प्रोग्राम’ हे नाव देण्यात आले आहे. यावर 162 अब्ज रुपये खर्च केले जातील.


विजयाचे एक पाऊल : इथे एका प्रकरणाकडे लक्ष द्या. टॉम स्टॅनबॅक यांच्या फुप्फुसाच्या जवळ इतके मोठे ट्यूमर झाले की, त्यांना गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होत असे. नवीन एपीजेनेटिक औषधांमुळे त्यांचे ट्यूमर संकुचित होतील का? हे जाणून घेण्यासाठी बाल्टिमोरच्या जॉन हापकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचे परीक्षण केले गेले. एसयू2सीच्या एका संशोधन पथकाचा निष्कर्ष होता की, जर एपीजेनेटिक औषधांमुळे कर्करोग नष्ट झाला नाही तरीही औषध घेतल्यानंतर इतर उपचारांमुळे परिस्थिती सुधारू शकते. झालेही असेच. स्टॅनबॅकने न्यूयॉर्कच्या मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये रेडिएशन थेरेपी केली. मागील दीड वर्षात त्यांचे ट्यूमर खूप संकुचित झाले. काही इतर रुग्णांनाही अशाच प्रकारे फायदा झाला. या यशाचे श्रेय जॉन हापकिन्सच्या आंकोलॉजिस्ट डॉ. स्टीफन बेलिन आणि दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाचे बायोकेमिस्ट डॉ. पीटर जोन्सच्या नेतृत्वाखालील पथकाला आहे. त्यांच्या पथकात जेनेटिसिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, बायोस्टेटिशियन, बायोकेमिस्ट, आंकोलॉजिस्ट, सर्जन, माहिती तज्ज्ञ, नर्स, तंत्रज्ञ आणि काही तज्ज्ञ आहेत. साधारणपणे इतके तज्ज्ञ एकत्र काम करत नाहीत. मागील तीन वर्षांत बायोइंजिनिअरिंग, नॅनो टेक्नॉलॉजी, औषधांच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. जनुकीय बदलांना सुस्थितीत आणण्यासाठी औषधांचा विकास होत आहे. प्रतिकारशक्तीचे पुनरुज्जीवन करणारी पद्धती शोधून काढण्यात आली आहे. ट्यूमरला होणारा रक्तपुरवठा थांबवण्यासाठीचा उपाय मिळाला आहे. डिपिन्होंच्या मते, हे अत्यंत वेगाने घडले आहे.


मोठे ध्येय : पॅनक्रियाटिक कॅन्सरमध्ये आजाराची माहिती नेहमी शेवटच्या स्टेजलाच होते. याच्या अधिकांश ट्यूमरवर शस्त्रक्रिया अशक्य आहे. मेमोरियल स्लोनचे सीईओ डॉ. क्रेग थॉमसन यांच्यासोबत एसयू2सीच्या पॅनक्रियाटिक ड्रीम टीमचे नेतृत्व करणा-या वॉन होफ यांचे ध्येय मृत्युदर कमी करणे आहे. तृर्तास पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या पहिल्या स्टेजने ग्रासलेले 25 टक्क्यांपेक्षा कमी रुग्णच वर्षभर जगतात. पाच संस्थांमध्ये 28 लोकांचे पथक पॅनक्रियाटिक पेशीत होणा-या मेटाबॉलिक बदलांवर लक्ष केंद्रित करत आहे. शास्त्रज्ञांच्या पथकाने शोध लावला आहे की, व्हिटामिन डीच्या माध्यमातून प्रतिकारक्षमता वाढवली जाऊ शकते. यामुळे कर्करोगांच्या पेशींपर्यंत किमोथेरपी पोहोचणे सोपे होईल. दोन वर्षांमध्ये एलब्यूमेनचे मिश्रण असलेले औषध शोधले गेले. ज्यामुळे इतर औषधांचा परिणाम वाढला.


तिस-या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमध्ये अ‍ॅडव्हान्स पॅनक्रियाटिक कॅन्सरच्या 861 रुग्णांना किमोथेरपीचे औषध एब्राक्सेन दिले गेले. औषधांच्या मिश्रणाने 48 टक्के रुग्णांची प्रकृती सुधारली. कर्करोगाविरोधी संशोधनाच्या प्रत्येक पैलूसाठी तज्ज्ञांचे पथक पुरेसे नाही. पथक किती काळापर्यंत काम करू शकेल, असा प्रश्न मग निर्माण होतो. एसयू2सी प्रारंभी तीन वर्षांपर्यंत निधी देते. तसे काही पथकांना नंतरही निधी मिळाला. तरही ‘टीम सायन्स’ची पद्धत कायम रूप घेईन. एका जुन्या कथानकाची ही नवीन स्क्रिप्ट आहे.


अनेक आघाड्यांवर लढा
अनेक प्रकारच्या शस्त्रांच्या माध्यमातून संशोधक कर्करोगाचा सामना करत आहेत. जेनेमिक्स, औषधे, निदानाच्या सरस पद्धतींमुळे या घातक आजाराशी लढा दिला जात आहे.


निदान
फुप्फुसाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी संशोधक रक्त तपासणीच्या सोप्या पद्धतीवर काम करत आहेत. याच्या माध्यमातून आजाराचे संकेत देणा-या सिरम प्रोटीनचा तपास लावला जाईल. सीटी स्कॅनसारख्या खर्चीक तपासण्या कराव्या लागणार नाहीत.


जनुकीय क्रम
मागील काही वर्षांमध्ये जीनोम्सच्या अध्ययनाच्या तंत्रज्ञानात चांगली सुधारणा झाली आहे. डॉक्टर कोणत्याही एखाद्या रुग्णाच्या जनुकीय संचाचा अभ्यास करू शकतात. या माध्यमातून रुग्णावर एकदम वेगळ्या पद्धतीने उपचार केले जाऊ शकतात.


जैवअभियांत्रिकी
संशोधकांनी बिझनेस कार्डप्रमाणे चिप तयार केली आहे. यात 78000 अत्यंत सूक्ष्म कॉलम आहेत. कॉलमवर लागलेले कोटिंग रुग्णाच्या रक्तातील नमुन्यांमध्ये मिसळलेल्या ट्यूमर पेशींना ओळखतात. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कर्करोगाची माहिती लवकर उपलब्ध होऊ शकेल.


एपीजेनेटिक्स
डीएनए डिमिथाइलेशन प्रक्रियेतून कर्करोगाचे जीनोम बनवणा-या जनुकांना निष्क्रिय करता येऊ शकते. औषधांच्या मात्रेने स्टेम सेल्सना पुन्हा एकदा जिवंत होण्यापासून रोखता येऊ शकेल.


विशेष औषधे
विशेष प्रकारच्या जनुकीय बदलांना लक्ष्य करणारी 800 पेक्षा अधिक औषधे तयार करण्यात आली आहेत.
अर्थसाहाय्य
निधी देणा-या पथकांनी तरुणांना आणि प्रतिस्पर्धी तज्ज्ञांना मान्यता देत एकत्र काम करण्याचा मार्ग दाखवला आहे.
रुग्णांची संख्या
2005 14 लाख
2013 17 लाख
2013 मध्ये कॅन्सरचे नवे रुग्ण
238590 पौरुष ग्रंथी
234580 स्तन
228190 फुप्फुस
102480 आतडे