आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Comparison Of Bengaluru And Hyderabad With Silicon Valley

भारतीय सिलिकॉन व्हॅलीतही चमक, या दोन शहरांची सिलिकॉन व्हॅलीशी स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीची भेट सध्या गाजते आहे. जगप्रसिद्ध आयटी हब असलेल्या सिलिकॉन व्हॅलीशी भारतातील दोन शहरे सध्या तुल्यबळ स्पर्धा करत आहेत. प्रथम सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया नावाने प्रसिद्ध असलेले बंगळुरू व आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करणारे हैदराबाद सिलिकॉन व्हॅलीच्या तुलनेत कुठे आहेत? ... बंगळुरूहून उपमिता वाजपेयी व हैदराबादहून धर्मेंद्रसिंह भदौरिया यांचा वृत्तांत...
बंगळुरू : इथे दर एका किमीवर ८ स्टार्टअप, दररोज नवी कंपनी
टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स ही भारतात येणारी पहिली विदेशी कंपनी होती. १९८० मध्ये त्यांनी जेव्हा इथे कार्यालय सुरू केले, तेव्हा सामान बैलगाडीतून आणावे लागले होते. आज हे शहर फायबर ऑप्टिक्सवर धावत आहे. येथील आयटी हबमध्ये इन्फोसिसपासून टेक महिंद्रापर्यंतच्या कंपन्या आहेत. १९०६ मध्ये विजेतून प्रकाशमान झालेले हे आशियातील पहिले शहर सध्या भारताच्या सिलिकॉन व्हॅलीच्या रूपात चकाकत आहे.

लिंक्डइनने आपल्या ३० कोटींहून जास्त व्यावसायिकांचा प्रोफाइल आणि डेटाचा अभ्यास करून सांगितले की, गेल्या वर्षी जगभरातून ४४ % सॉफ्टवेअर प्रोग्रामर बंगळुरूस आले. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत जाणाऱ्यांची संख्या ३१ % होती. एक काळ असा होता की बंगळुरूने क्रियापदाचे रूप धारण केले होते. अमेरिकेत विचारणा केली जात होती- हॅव यू बीन बँग्लोर्ड? बंगळुरू जगाच्या कानाकोपऱ्यातून नोकऱ्या खेचून आणणारे शहर मानले जाते. सध्या हे शहर स्टार्टअप कॅपिटल झाले आहे. इथे दररोज एखाद्या स्टार्टअपची सुरुवात होते.
इंदिरानगर किंवा कोरमंगला भागात झाडावर लावलेल्या स्टार्टअपमधील नोकरीविषयक जाहिरातीचे दृश्य नवे राहिलेले नाही. मात्र, तोपर्यंत बंगळुरूमध्ये पेटंटसारखे अभिमान वाटावे, असे काम झालेले नव्हते. सध्या प्रत्येक ई-कॉमर्सची मुळे बंगळुरूत सापडतात. आता अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून बंगळुरू सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी स्टेट्सवर पोहोचला आहे. जगातील अनेक सॉफ्टवेअरमधील अडचणी सोडवण्याचे केंद्र हे शहर झाले आहे. लवकरच ते प्रॉडक्ट प्रॉब्लेम्सचेही केंद्र ठरणार आहे.

नॅसकॉमचे इंडस्ट्री इनिशिएटिव्हचे उपाध्यक्ष के. एस. विश्वनाथन म्हणाले, सिलिकॉन व्हॅलीसाठी इको-सिस्टिमची आवश्यकता असते. आंत्रप्रेन्योर, सरकार, शिक्षण क्षेत्र आणि अन्य घटक मिळून त्याला आकार देतात. २०१४-१५ मध्ये भारतीय उद्योगाची वाढ १२ टक्के झाली. बंगळुरूची औद्योगिक वृद्धी १४ % आहे. गेल्या पाच वर्षांत भारताच्या आयटी निर्यातीत एकट्या बंगळुरूचा वाटा ३४ टक्के आहे. १९९५ मध्ये इथे देशातील पहिल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कची स्थापना झाली. या माध्यमातून कंपन्या मोफत आपला डेटा अपलोड आणि डाऊनलोड करू शकत होत्या. शहराचे तंत्रज्ञानातील स्थित्यंतर हेच असल्याचे विश्वनाथन यांचे म्हणणे आहे.
हैदराबाद : एका वर्षात ५० हजार तरुणांना दिल्या नव्या नोकऱ्या
हैदराबादने वेग पकडला आहे. शहर स्टार्टअप्स हबच्या रूपात करण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील सर्वात मोठे स्टार्टअप्स इंक्युबेटर सेंटर टी-हब ऑक्टोबरपासून येथे काम सुरू करेल. टी-हबचे सीओओ श्रीनिवास कोलिपारा म्हणाले, इथे ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून जगातील सर्वात वेगवान एक हजार एमबीपीएसची इंटरनेट स्पीड देणार आहोत. सध्या हा वेग अमेरिकेच्या गुगल फायबर नेटकडे आहे. तेलंगण राज्यनिर्मितीच्या आधी तीन-चार वर्षे आंदोलनामुळे आयटीची वाढ मंदावली होती. मात्र, गेल्या वर्षी जगातील ज्या चार प्रमुख कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी भारताची निवड केली त्या तीन दिग्गज गुगल, उबेर आणि अॅमेझॉनने हैदराबादला पसंती दिली आहे. उबेरला १७ दिवसांत, गुगलला १९ दिवसांत आणि अॅमेझॉनला ३० दिवसांत सर्व मंजुऱ्या दिल्या. टीसीएस आणि इन्फोसिस कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करत आहेत. २० लहान कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या वर्षी आयटी कंपन्यांनी ५० हजार नवे रोजगार दिले. इथे १७ % व्यवसायवृद्धी नोंदली आहे.

शहर पुढील ५० वर्षांची प्रगती लक्षात घेऊन वाढत आहे. १७० किमीच्या रिंग रोडलगत दोन्ही बाजूंस एक-एक किमी क्षेत्र द इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इन्व्हेस्टमेंट रिजन (आयटीआयआर) जाहीर करण्यात आले आहे. पोचारम व आदिबरलामध्ये इन्फोसिस आणि टीसीएस स्वत:ची आयटी पार्क विकसित करत आहेत. जवळपास २३ हजार कर्मचारी असलेल्या इन्फोसिसचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट नरसिंहा राव म्हणाले, व्यवसायासाठी बुद्धिमान, कुशल कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि सरकारचे सहकार्य आवश्यक असते. हैदराबादमध्ये १५ वर्षांपासून हे पूरक वातावरण आहे. एवढ्या वर्षांत एक दिवसही आयटी सेंटर बंद झाले नाही. तेलंगणा आंदोलनातही राजकीय पक्ष आयटीपासून दूर राहिले. ४.०७ लाख आयटी व्यावसायिकांमध्ये ६५ टक्के स्थानिक रहिवासी आहेत. आयटी उद्योगाचे मंडळ हैदराबाद सॉफ्टवेअर एंटरप्रायजेस असोसिएशनचे अध्यक्ष आणि अमेरिकन कंपनी प्रोग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व केंद्रप्रमुख रमेश लोगानाथन म्हणाले की, हैदराबादनजीक १५० हून जास्त इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. उद्योग क्षेत्रातच निवास व्यवस्था उपलब्ध होत असल्यामुळे तरुण बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, पुण्यापेक्षा हैदराबादला प्राधान्य देत आहेत. अलाहाबादचे आयटी व्यावसायिक मोहंमद अब्दुल्लांनुसार, तरुण व्यावसायिकांसाठी हे खूप चांगले शहर आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या दोन शहरांची सध्यस्थिती...