आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादुष्काळ: 1972 पेक्षा भीषण परिस्थिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी महाराष्ट्र एका भीषण दुष्काळाला समोरा जात आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी म्हटले आहे की, यंदाचा दुष्काळ हा 1972 पेक्षादेखील बिकट आहे. अशा प्रकारची तुलना एवढंच अधोरेखित करते की 2012-13 चा दुष्काळ हा 1972 सारखीच एक मोठी नैसर्गिक आपत्ती आहे. अशा विधानांमुळे दुष्काळाची कारणे वेगळी होतात; पण खरंच यंदाचा दुष्काळ 1972 पेक्षा बिकट आहे? खरंच ती एक नैसर्गिक आपत्ती आहे?
राज्यातील 1७ सर्वाधिक दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील 2012 च्या पर्जन्यमानाची 1972 शी तुलना केल्यानंतर काही वेगळंच चित्र समोर उभं राहतं. meterologically या वर्षाला 1९७2 पेक्षा भीषण दुष्काळ अजिबात म्हणता येणार नाही. मात्र, hydrologicaly, ह्या वर्षाला कदाचित 1९७2 पेक्षाही जास्त दुर्दैवी म्हणता येईल. आणि ह्याच्या मागचे कारण प्रत्येक स्तरावरती केलेले चुकीचे जलव्यवस्थापन जसे की, चुकीच्या ठिकाणी अवाजवी धरण बांधणे, चुकीच्या पीक पद्धती स्वीकारण्याला, कमी महत्त्वाच्या क्षेत्रांकडे पाणी वळवण्याला, महाराष्ट्र जल नियामक प्राधिकरणाचे (म. ज. नि. प्रा.) बेजबाबदार पाणी व्यवस्थापन आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे केंद्र सरकारही तितकेच दोषी आहे.
1९७2 आणि 2012 च्या पर्जन्यामानाची तुलनात्मक स्थिती पाहूयात. ज्या जिल्ह्यांमध्ये त्याचं सरासरी पर्जन्यमान व 2012 मधील पर्जन्यमान ह्यात 50% हून अधिक तफावत आहे असे आकडे 1९७2 साठी लाल पृष्ठभागावर, तर 2012 मध्ये लाल रंगाने दर्शवले आहेत. जून 2012 मध्ये ८ जिल्ह्यांत अशी स्थिती दिसून आली. जुलै महिन्यात कोणत्याही जिल्ह्यात ही परिस्थिती नव्हती. ऑगस्ट महिन्यात औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबादमध्ये 50% हून कमी पाऊस झाला (तिथे जुलै 2012 मधेही कमी पाऊस झाला होता). सप्टेंबर 2012 मध्ये ही स्थिती फक्त जालना जिल्ह्यात होती, तर ऑक्टोबर महिन्यात धुळे आणि जालन्यात पाऊस 50 % नी कमी झालेला होता. तुलनात्मकरीत्या, 1९७2 मध्ये सरासरीपेक्षा 50% हून कमी झालेले जिल्हे जून महिन्यात 3, जुलै महिन्यात ९, ऑगस्टमध्येसुद्धा ९, सप्टेंबरमध्ये ६, तर सर्व 1७ जिल्ह्यांत ऑक्टोबर 1९७2 मध्ये त्यांच्या सरासरीच्या 50% हून कमी पाऊस झाला होता. जूनचा अपवाद वगळता खरं तर 1९७2 मध्ये प्रत्येक महिन्यात 2012 पेक्षा कमी पाऊस पडला होता.

शेजारील तक्त्यात, ह्या जिल्ह्यांत पाच महिन्यांत (जून ते ऑक्टोबर) एका normal वर्षातील एकूण पर्जन्यमानाची 1९७2 आणि 2012 मध्ये झालेल्या पावसाशी तुलना दाखवून दिलेली आहे. त्यातच 1972 मध्ये पडलेल्या पावसाची normal वर्षातील पावसाच्या व 1972 च्या पावसाच्या तुलनेत टक्केवारी वेगळ्या स्तंभात दिली गेली आहे. आपल्याला असं दिसतं की 2012 मध्ये, सांगली व धुळे जिल्ह्यात 1972 पेक्षा कमी पाऊस पडला होता, तसेच जालना आणि सातार्‍यातही 1972 पेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र, त्या फरकाचं प्रमाण ७% च्या आसपास होतं. मुख्य म्हणजे इतर 13 जिल्ह्यांत 1972 पेक्षासुद्धा 2012 मध्ये जास्त पाऊस होऊन गेला होता.
ह्या वर्षीच्या दुष्काळाची 1972 शी तुलना करताना हेसुद्धा लक्षात घ्यावयास हवे की 1971 चे वर्ष अवर्षणाचे होते, मात्र तुलनेत, 2011 मध्ये
महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून गेला होता व सर्व धरणे भरलेली होती. राज्याच्या 2011 मधील आर्थिक सर्वेक्षण अहवाल नमूद करतो की, 2011 मध्ये राज्यात सरासरीपेक्षा 102.3 % जास्त पाऊस पडलेला होता. राज्याच्या कृषी आयुक्तांनी 2011 मध्ये सांगितलं की, यंदा पाऊस चांगला झाला असल्यामुळे पीक चांगलं आलं आहे. सरासरीपेक्षा जास्त पडलेल्या
पावसामुळे जवळपास सर्व धरणे भरली आहेत, ज्यांचा रब्बी मोसमासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. हजारो कोटी खर्च करून शेकडो संस्था गठीत करून जर 40 वर्षांनंतर पाऊस जास्त पडूनही दुष्काळ भीषण असेल तर या मागची कारणे कोणती?