आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसंगतीसाठी शिकवले टेनिस, जिंकला विम्बल्डन चषक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यश सुमीत नागल, टेनिस खेळाडू
जन्म- १६ ऑगस्ट १९९७
वडील- सुरेश नागल (शिक्षक), आई - कृष्णा (गृहिणी), बहीण - साक्षी
चर्चेत - विम्बल्डन मुलांची दुहेरी स्पर्धा जिंकली

हरियाणाच्या झज्जरमध्ये जन्मलेला सुमीत पुढच्या महिन्यात अठरा वर्षांचा होईल. त्या वेळी तो स्वत:ची बाइक चालवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी अर्ज करेल. लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांच्यासोबत सुमीतनेही ज्युनियर्सच्या स्पर्धेत भारताचा लौकिक वाढवला आहे.
ज्युनियर ग्रँडस्लॅम किताब जिंकणारा तो सहावा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी किताब जिंकणाऱ्यांमध्ये रामनाथन कृष्णन (१९५४), लिएंडर पेस (१९७९), सानिया मिर्झा (२००३) आणि युकी भांबरी यांचा समावेश आहे.
सुमीतचे वडील सुरेश नागल म्हणाले, सुमीत सात वर्षांचा असतानाच त्याला दिल्ली डेव्हलपमंेट अथॉरिटी (डीडीए) टेनिस अकादमीत दाखल केले होते. सुमीत एवढ्या उंचीचे यश गाठेल असा विचारही केला नव्हता. सुरेश दहा वर्षांपूर्वी लष्करातून निवृत्त झाले असून सध्या एमसीडीच्या शाळेत शिकवतात. सुमीतने लहानपणी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.
२००७ ची घटना आहे. आर.के. खन्ना अकादमीतील प्रशिक्षण शिबिरात सुमीतची निवड झाली आणि इथेच तो महेश भूपतीच्या नजरेत भरला होता. सुमीतच्या आयुष्यासाठी हा टर्निंग पॉइंट होता. यातून सुमीतचे जीवन पालटले. बंगळुरूहून कॅनडात व त्यानंतर जर्मनीतील प्रशिक्षण असा विचार करता सुमीत दीर्घकाळ घरापासून लांब आहे. महेश भूपतीने सुमीतला पैलू पाडले. टेनिस खेळण्यासाठी पैसा गुंतवणे आणि सतत बाहेर पाठवणे सुरेश यांच्या आवाक्यात नव्हते, त्या त्या वेळी महेश भूपतीने मदत केली. त्यामुळे महेश भूपती आमच्यासाठी ईश्वर आहे, अशी भावना सुरेश नागल यांची आहे. नागल कुटंुब राहत असलेल्या पश्चिम दिल्लीच्या नांगलोईमध्ये विम्बल्डन स्पर्धाच फारशी माहीत नाही. त्यांच्या घराभोवती दोन शाळा आहेत. मात्र, तेथील मुलांनीही कधी टेनिसच्या रॅकेट पाहिल्या नाहीत. या वातावरणातून बाहेर काढण्यासाठीच त्याला टेनिस खेळायला पाठवले आणि त्याने यश खेचून आणल्याचे सुमीतची बहीण साक्षीने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...