आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणूक करताना स्थैर्याकडे अधिक लक्ष द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल बहुतांश लोक जास्तीत जास्त कर वाचवण्याच्या प्रयत्नात मग्न आहेत. बचत करण्यासाठी अशा योजनांमध्ये पैसा गुंतवा की त्यामुळे जास्तीची कर सवलत मिळेल, कराचा जास्त पैसा वाचवता येईल आणि चांगली बचतही होईल. गुंतवणूक करण्यापूर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवा...

तुम्ही कर वाचवण्यासाठी विमा पॉलिसी घेऊ इच्छित असाल तर तुम्ही दरवर्षी प्रीमियम भरू शकाल का, हे स्वत:शीच विचारा. बहुतांश लोक पॉलिसी घेताना घाई करतात आणि जास्त प्रीमियम असलेली एखादी पॉलिसी घेतात. पॉलिसी मध्येच सोडून देणे चांगले नाही. त्यामुळे तुम्ही गुंतवलेली रक्कम परत मिळत नाही. दीर्घकालीन प्रॉडक्ट असूनही यूलिप्समध्ये केवळ पाच वर्षांपर्यंत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. अशा गुंतवणुकीतून सकारात्मक परिणाम मिळवायचे असतील तर किमान पंधरा वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. क्षमतेपेक्षा जास्त गुंतवणूक करणे हानिकारक ठरू शकते.

पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. त्यातून तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असल्याचे जाणवते. तुम्ही पीपीएफमध्ये काही पैसे गुंतवू शकता. काळानुरूप ते पैसे वाढत जातात. त्यात गुंतवणूक केल्याने करातून सूटही जास्त मिळते.

पीपीएफमध्ये 80 सी अंतर्गत एक लाख रुपयांची गुंतवणूक करणे चूक आहे. पीपीएफ ही उत्पन्न देणारी गुंतवणूक आहे. त्यात व्याज द्यावे लागते. तुम्ही पंधरा वर्षांसाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्ही जास्त व्याजदर मिळणा-या ग्रोथ ओरिएंटेड गुंतवणूक केली पाहिजे. तुम्ही जर तुमची सगळीच बचत पीपीएफमध्ये गुंतवत असाल तर तुम्ही सेवानिवृत्तीसारख्या दीर्घकालीन ध्येय्यासाठी संथ गतीच्या रेल्वेत बसला आहात.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएसएसएस) अगदीच भिन्न आहे. ही गोल-ओरिएंटेड इक्विटी गुंतवणूक आहे. तुम्ही जर दीर्घकालीन योजना आखत असाल किंवा पैसा गोळा करत असाल तर ती सर्वात फायदेशीर आहे. दीर्घकाळानंतर चांगले रिटर्न देतात, अशा एखाद्या प्रॉडक्टची निवड करा. त्या प्रॉडक्टचे ट्रॅक रेकॉर्ड पाहा. बचतीतील काही भागाची गुंतवणूक करा. कर सवलतीसाठी बचत करताना काही पैसा पीपीएफमध्ये आणि काही पैसा कर बचतीच्या म्युच्युअल फंडात गुंतवा. त्यामुळे वृद्धी आणि स्थिरता दोन्हीही मिळू शकतील. पीएफमध्येही गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळेल.

जेव्हा तुम्ही घाईगडबडीत निर्णय घेता तेव्हा गुंतवणुकीमध्ये चूक होण्याची शक्यता असते. तुम्ही यावर्षी चुकीचे निर्णय घेतले असतील तर काही हरकत नाही. पुढील वर्षासाठी निर्णय घ्यायला सुरुवात करा. तुम्ही पीपीएफ आणि ईएसएसएसमध्ये मासिक गुंतवणूक करू शकता. तुम्ही डायरेक्ट बँक स्ट्रान्सफरचा पर्याय निवडू शकता. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला पैसे जमा करण्याचा ताण राहणार नाही. तुम्हाला अनेक प्रॉडक्ट्स आकर्षित करत असतात. त्यांची विक्रीही चांगली झालेली असेल; परंतु तुम्ही तुमची क्षमता आणि गरजा ध्यानात घेऊन प्रॉडक्टची निवड करा.