आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Prepared Itself For 2016; BJP\'s Prime Minister Advani

काँग्रेसची तयारी \'२०१६\'ची; भाजपचे पंतप्रधान अडवाणीच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(दिव्यमराठी वेब टीमचे हे विश्लेषण आहे.)

भारतामध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करुन निवडणुका लढण्याचा तसा ट्रेंड नाही. देशात सर्वाधिक काळ सत्ता काँग्रेसकडे राहिली आहे. त्यांच्याकडे सुरुवातीला नेहरु त्यानंतर इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. सोनिया गांधी यांच्याकडेही पंतप्रधानपद चालून आले होते मात्र, त्यांनी पंतप्रधान होण्यास बेगडी नकार दिला. त्यामुळे काँग्रेसला पंतप्रधानपदाचा उमेदवार प्रोजेक्ट करण्याची फारशी गरज आजपर्यंत पडली नाही. अटलबिहारी वाजपेयी यांचे 1996 मधील 13 दिवसांचे आणि त्यानंतर 1998 मधील 13 महिन्यांच्या सत्तेनंतर 1999 च्या निवडणुकीत भाजपतर्फे 'अगली बारी अटलबिहारी'चा नारा देण्यात आला होता. एवढा एक अपवाद वगळला तर भारतात पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करुन कधीही निवडणुका झालेल्या नाहीत. आघाड्यांचे राजकारण सुरु झाल्यापासून मात्र व्यक्ती केंद्रीत राजकारणाला सुरुवात झाली. प्रादेशिक पक्षांचे नेते हे त्या त्या भागातील करिष्माई नेते होते आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्यामुळे स्वतःला प्रोजक्ट करण्याला त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने प्राधान्य दिले. आगामी निवडणुका मात्र सरळ सरळ दोन पक्षांच्या नेत्यांना समोर ठेवून होऊ घातल्‍या आहेत.

प्रमुख विरोधीपक्ष भारतीय जनता पक्षाने त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी असतील असे संकेत देऊन मोठी खेळी खेळली आहे तर काँग्रेस राहुल गांधी यांचे नाव जाहीर करण्यास अजूनही तयार नाही. त्यासोबतच सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या युपीए दोनचे नायक डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातही 2014 च्या निवडणुका होणे शक्य नाही.