आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या सोशल मीडियाची धुरा युवा महिला नेत्याच्या हाती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागच्या काही महिन्यांपासून काँग्रेसच्या सोशल मीडियाची रणनीती बदलली अन् अधिक आक्रमक झाली आहे. याची धुरा दिव्य स्पंदन सांभाळत असून काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी त्यांना ही जबाबदारी सोपवली. मागच्या वेळी त्या खासदार होत्या. मात्र, २०१४ मध्ये मांड्यातून ५५०० मतांनी पराभूत झाल्या.   

२००४ मध्ये ‘कुथ्थू’ चित्रपटातील रम्या नामक भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी तामिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर २००६ मध्ये ‘तनानाम तनानाम’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बहुमान मिळाला. त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट आले. आईच्या काँग्रेसच्या जवळिकीमुळे २०१२ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.   

ब्रँडी, चॅम्प व टिनी नामक श्वानांसोबत राहणाऱ्या दिव्य स्पंदन यांची आई ‘सिंगल पॅरेंट’ आहेत.  उ टीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण झाले. आठवीपर्यंत दिव्य त्यांच्या सावत्र वडिलांच्या घरीच राहायचा. त्यांनीच शिक्षणाचा खर्च केला. आई काँग्रेसशिवाय बंगळुरू पोलिस आयुक्तालयात आत्महत्या हेल्पलाइनमध्ये कर्मचारी होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांच्या शिफारसीवरून दिव्य यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला. कृष्णा हे दिव्य यांच्या वडिलांचे घनिष्ठ मित्र होते. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चित्रपटांचे प्रस्ताव मिळू लागल्याने दिव्य अभिनयाकडे वळल्या. आपल्या कोणत्याच प्रतिक्रियेत त्या सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख व्यक्तींचे नाव घेत नाहीत. पण त्यांचे उत्तर लोकांना राहुल गांधींकडे आकर्षित करत आहे राहुल यांनी जीएसटी व कमाल विक्री मूल्यावर दिलेले भाषण त्या नव्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करत असून लोकांनी त्याची प्रशंसा केली आहे. युवा खासदाराच्या रूपात त्या पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यांच्या वक्तव्यामुळे (पाकिस्तान चांगला आहे, नरक नाही) खूप वाद झाले होते. 
 
पुढील स्‍लाईडवर पहा कोण आहेत, दिव्य स्पंदन...  
 
बातम्या आणखी आहेत...