आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतर खर्चाप्रमाणेच गुंतवणुकीचाही विचार करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारातील अचानक झालेल्या चढ-उताराने गुंतवणूकदार घाबरून जातात. रुपयात घसरण, भारतीय रिझर्व्ह बँकेने उचललेली पावले, सरकारचा निष्क्रियपणा आणि बाजारपेठेतील तटस्थपणा यामुळे नैराश्य येते. आपण प्रत्येक गोष्ट स्वीकारतो. पण जेव्हा गुंतवणुकीची वेळ येते तेव्हा बाजारपेठेत सातत्य असावे, असे आपल्याला वाटते. आपली रक्कम सुरक्षित राहावी, अशी आपली इच्छा असते. यात नफा झाला तर आपला रिटर्न तयार होतो. बाजारात वेगाने होणा-या चढउतारामुळे आपण घाबरून जातो. त्यामुळे आपण डिपॉझिट व सेव्हिंग सर्टिफिकेटसाठी अर्ज करतो.
जीवनाच्या इतर बाबींमध्ये आपण या कटकटीपासून दूर आहोत. बहुतांश कुटुंबे बाहेर जेवण करतात. त्या वेळी त्या ठिकाणचे किचन आपण तपासत नाही. त्याचप्रमाणे आपण खासगी रुग्णालयात उपचार घेतो. हे सर्व नियम म्हणजे एका प्रकारचे धोका पत्करणेच आहे; पण ते आपण अगदी सहजपणे घेतो. त्याचे कारण म्हणजे आपल्याला त्याची सवय झाली आहे.

अनेकदा अशा प्रकरणांमध्ये आपले अनुभव वेगवेगळे असतात. आपण विचार करतो की, एखाद्या ठिकाणी इतके लोक जेवतात तर मग जेवण चांगलेच असेल. इतके लोक उपचार घेतात तर डॉक्टर विश्वासू असेल; पण बाजारात गुंतवणूक करण्याची समस्या सामान्य नियमांपेक्षा वेगळी आहे. आपण जो विचार करतो आणि आपल्याला जे मिळते त्यात बरीच तफावत असते. तोट्याबाबत तर विचारही नाही करू शकत. त्यामुळे जेव्हा पैशाचा विचार येतो तेव्हा, भावनांचा विजय होतो व आपण घाबरून शंका घेऊ लागतो; पण हे आपण बदलू शकतो.


ज्या प्रकारे आपण इतर निर्णय घेतो त्याच प्रकारे याचाही विचार करायला हवा. पण गुंतवणूक करताना सावध राहणे गरजेचे ठरते. बाजारातून नफा मिळवण्यासाठी मोठा संयम लागतो. विशेष म्हणजे या संयमाची परीक्षा वारंवार होत असते.