आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगारूच्या व्हिडिओवरून इंटरनेटवर वाद रंगला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स येथील तरोंगा प्राणिसंग्रहालयाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक कांगारू येथील पाळीव कुत्र्यावर हल्ला करतो. एवढ्यात एक तरुण या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी कांगारूच्या तोंडावर मारतो. यामुळे कांगारू तरुणाकडे आश्चर्याने पाहतो. या व्हिडिओवर जगभरात खूप वाद प्रतिवाद झाले. अनेकांनी कांगारूला मारणाऱ्या तरुणावर टीका केली. मात्र हा तरुण प्राणिसंग्रहालयातीलच एक कर्मचारी (ग्रेग टोन्किन्स)असल्याचे चौकशीनंतर समोर आले. आपल्या मित्राच्या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी असे केल्याचे ग्रेगने सांगितले. तरीही कांगारूला पंच न मारता कुत्र्याला सहजपणे सोडवता आले असते, असे अनेकांचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या मते, ग्रेगने असे केले नसते तर त्यालाच रुग्णालयात जावे लागले असते.
बातम्या आणखी आहेत...