आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Controversy Of Shiv Sena Chief Balasaheb Thackeray

Controversy : हिंदूहृदयसम्राट बाळ ठाकरेंचे होते कायम वादाशी नाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधी दक्षिणेला, मग उत्तरेला विरोध
बाळासाहेबांनी परप्रांतीयविरोधी राजकारण केले. 1960 ते 1970च्या दरम्यान दक्षिण भारतीयांना मुंबईतून पिटाळून लावण्याचे आदेश देण्यात आले. ‘लुंगी हटाओ, पुंगी बजाओ’ अशी घोषणा देण्यात आली. पुढे उत्तर भारतीयांविरुद्ध दंड थोपटले. त्यातही खासकरून उत्तर प्रदेश व बिहारच्या लोकांच्या मुंबईत येण्यावर शिवसेनेने तीव्र विरोध केला. चिथावणीखोर भाषणावरून उच्च् न्यायालयाच्या निर्देशानुसार जुलै 1999 मध्ये बाळासाहेबांना मतदान करण्यावर आणि निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. 2005 मध्ये ही बंदी उठवण्यात आली.

हिंदू आत्मघाती पथकांवरून वाद
2002 मध्ये बाळासाहेबांनी हिंदू आत्मघाती पथके स्थापन करण्याचे आवाहन केले. सरकारने त्यांच्याविरुद्ध प्रकरण दाखल केले. तथापि, बाळासाहेबांच्या आवाहनावरून दोन संघटना निर्माण झाल्या. निवृत्त लेफ्टनंट कर्नल जयंतराव चितळे आणि लेफ्टनंट जनरल पी.एन. हून यांचे या संघटनांवर नियंत्रण होते.

क्रिकेट मॅचला नेहमीच विरोध
भारत-पाक क्रिकेट मॅचला नेहमीच विरोध केला. बाळासाहेबांच्या आदेशावरून शिवसैनिकांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमची धावपट्टी (आॅक्टोबर 1991) उखडून टाकली होती. येत्या डिसेंबरमध्ये होणा-या भारत-पाक सामन्यालाही बाळासाहेबांनी हरकत घेतली होती. 2011 मधील वर्ल्डकपच्या वेळी मनोहर जोशी म्हणाले होते की, पाकिस्तान फायनलमध्ये जात असेल तर मॅच कोठे आणि केव्हा होईल हे बाळासाहेब ठरवतील.

अमिताभ यांची मातोश्रीवर जाऊन माफी
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये अनेक वादग्रस्त लेख लिहिले. 2007 मध्ये त्यांनी हिटलरची प्रशंसा केली. 2010 मध्ये शाहरुख खानच्या ‘माय नेम इज खान’ला विरोध केला. जया बच्च्न यांच्या वक्तव्यानंतर अमिताभ यांनाही मातोश्रीवर जाऊन माफी मागावी लागली होती.

नाटक, चित्रपट, कलावंतांना विरोध
नाटककार विजय तेंडुलकर यांच्या सखाराम बाइंडर आणि घाशीराम कोतवाल या नाटकांना विरोध केला. गोविंद निहलानी यांचा चित्रपट तमस, दीपा मेहता यांचा फायर, शाहरुखचा माय नेम इज खान, पाकिस्तानी गायक गुलाम अली, चित्रकार एम.एफ. हुसेन यांना ते नेहमीच विरोध करत आले.

रश्दींचे पुस्तक आणि सरकार
सलमान रश्दी यांनी आपल्या द मुर्स लास्ट साइट या कादंबरीत बाळासाहेबांसारखीच व्यक्तिरेखा रेखाटली होती. सुकेतु मेहता यांच्या मॅक्झिमम सिटी या पुस्तकात बाळासाहेबांची मुलाखत आहे. याशिवाय बॉलीवूडच्या सरकार या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिरेखेशी मिळतेजुळते पात्र होते. शिकागोवर अल कपोने यांचे साम्राज्य होते, तसेच बाळासाहेबांचे मुंबईवर आहे.

चुकीवर माफीही मागितली
14 फेब्रुवारी 2006 रोजी शिवसैनिकांनी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी महिलांना मारहाण केली होती. त्यावर बाळासाहेबांनी सर्वांची माफी मागितली होती.

वादग्रस्त गुद्दे
मैद्याचे पोते

आम्हाला आचारसंहितेचा बडगा दाखवला जातोय. माझ्या शिव्या खाण्याची लायकी आहे अशांनाच मी शिव्या देतो. मी म्हणे नेत्यांवर वैयक्तिक टीका करतो. यापुढे तसे करता येणार नाही. ठीक आहे, यापुढे मी शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणणार नाही. मग ठीक आहे?

‘अ‍ॅट्रॉसिटी’ रद्द करू
राज्यात ‘टाडा’चा गैरवापर होतोय, तो टाळला जाईल. ‘टाडा’मध्ये अनेक जण विनाकारण सडत आहेत. ‘टाडा’चा राजकीय कारणासाठी वापर करू देणार नाही! जाती-जातीत कलह माजवणारा ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ही आपले सरकार रद्द करील. दलितही आमचेच आहेत.

तोंडात वाजवून न्याय मिळवा
तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. पण न्याय हा झालाच पाहिजे.

फिफ्टी-फिफ्टी
महिलांसाठी 33 टक्के आरक्षण वगैरे ठीक आहे; पण नुसत्या ठरावांनी न्याय मिळतो का? आम्ही तर म्हणतो, सरळ 50 टक्केच करून टाका की! ब-याच ठिकाणी फिफ्टी-फिफ्टी असतं की नाही, मग इथं का नको?

साखरसम्राटांना इशारा
आजवर साखरसम्राटांनी आमच्या गरीब शिवसैनिकांना, शेतक-यांना पिळलं. त्यांचा ऊस फुकट गेला. कडबा झाला. मी आमच्या जयप्रकाश मुंदडांना सांगितलंय, उसापेक्षाही यांना पिळून काढा.
माझ्यात हिटलरचा संचार होऊ शकतो
* विधानसभेच्या आगामी निवडणुका या केवळ निवडणुका नाहीत. हे युद्ध आहे युद्ध! नुसतं युद्ध नव्हे, तर निराळ्या अर्थाने ते धर्मयुद्धच आहे!! या युद्धात मी रावणाच्या विरोधात उभा राहिलोय. हे युद्ध जिंकायला मी समर्थ आहे आणि तुम्हीच माझी शक्ती आहात. मी हिटलरसारखा वागलेलो नाही, पण देशद्रोह््यांचे पाऊल जर वाकडे पडलेच तर याद राखा! माझ्यात हिटलरचा संचारही होऊ शकतो. (15 डिसेंबर 1994)