आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग लावणाऱ्यावरच अग्निशमनची जबाबदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओक्लाहोमा या अमेरिकन राज्याचे अॅटर्नी जनरल स्कॉट प्रुइट हे पर्यावरण उल्लंघन प्रकरणातील वादग्रस्त व्यक्ती आहेत. अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्कॉट यांना पर्यावरण संरक्षण संस्था (ईपीए) प्रमुख हे पद देण्याचे ठरवले आहे. असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे प्रमुख डॉ. रश हॉल्ट म्हणाले की, आम्ही ट्रम्प यांच्या निर्णयाशी सहमत नाहीत. सिएरा क्लब या पर्यावरण समूहाच्या मते, स्कॉट यांना हे पद देणे म्हणजे, आग लावणाऱ्यावरच अग्निशमन विभागाची जबाबदारी सोपवण्यासारखे आहे. ट्रम्प यांच्यापासून संपूर्ण पृथ्वीचा बचाव करा, अशी मोहीम या समूहाद्वारे चालवली जात आहे. अंटार्क्टिका खंड आणि आर्क्टिक महासागरातील बर्फ झपाट्याने वितळत असताना स्कॉट यांची या पदावरील नियुक्ती मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे, असे समूहाचे मत आहे.
बातम्या आणखी आहेत...