आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Corporate Power: अनेक नामवंत व्यक्ती पदावरून पायउतार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील काही दिवसांत जगविख्यात कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. यांचे वेतन कोट्यवधीत होते. याहू, जेट एअरवेजसारख्या कंपन्यांसोबतच भारतातील आयटी क्षेत्रातील दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी इन्फोसिसमधील दोन नामवंतांचाही यात समावेश आहे. यापैकी तीन दिग्गजांनी खासगी कारणांमुळे, तर हेन्रिक डी कॅस्ट्रो यांनी याहू प्रमुखाच्या सांगण्यावरून पद सोडले.
परिवर्तनाचा भाग बनण्यास सज्ज
@वेंकटरमण बालकृष्णन
इन्फोसिसमध्ये सीएफओ होते.
> शिक्षण- बीएसस्सी, सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए
> कार्य - कंपनी फायनान्स
> राजीनामा - डिसेंबर 2013 मध्ये
1991 मध्ये बालकृष्णन इन्फोसिसमध्ये रुजू झाले आणि बढती मिळवत मुख्य आर्थिक अधिकारी बनले. दरम्यान, त्यांना सीईओ पद मिळणार असल्याची चर्चाही होती. इन्फोसिस मंडळाचे सदस्य असलेले 48 वर्षीय व्ही. बालकृष्णन यांनी त्यांचे निम्मे आयुष्य इन्फोसिसमध्येच घालवले. नोकरी सोडण्यापूर्वी त्यांनी मुलगी श्वेता आणि स्नेहाच्या नावे असलेले इन्फोसिसचे 1 लाख शेअर्स विकले. त्यांचे दर प्रति शेअर 3561 रुपये इतके असून एकूण किंमत 33 कोटींच्या घरात आहे. 125 कोटी रुपये गुंतवून व्हेंचर फंड बनवण्याचा बालकृष्णन यांचा निर्धार आहे. त्यांच्यापूर्वी त्यांचेच सहकारी मोहनदास पै यांनी इन्फोसिस सोडून अशा प्रकारचा फंड तयार केला होता.
बालकृष्णन यांनी पद सोडताच कंपनीच्या शेअर्स दरात दोन टक्क्यांनी घसरण झाली. त्यांच्या राजीनाम्यामुळे कंपनीला कोणतीच अडचण होणार नसल्याचे इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. कंपनीने बालकृष्णन यांच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलियात शाखा सुरू केली होती.
नोकरी सोडण्याचे कारण दिल्लीतील निवडणुकांचे निकाल आश्चर्यकारक होते असे बालकृष्णन यांचे मत होते. त्यामुळे त्यांनासुद्धा या परिवर्तनाच्या प्रवाहात सामील होण्याची इच्छा आहे.