आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुपदेशन: परीक्षा, मुले आणि पालक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

१० वी आणि १२ वी च्या परीक्षा उंबरठ्यावर येऊन उभ्या आहेत आणि सर्व घराघरांतून परीक्षेचे वारे वाहायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच दिवसांत १०वी-१२वीच्या घरांमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे या लेखमालेचा श्रीगणेशा १० वी- १२ वीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासाठीच करणे अत्यंत प्रस्तुत आहे.

परीक्षांचा मोसम जवळ आला की समुपदेशकाकडे आपल्या पाल्याच्या अभ्यासाविषयी तक्रारी घेवून येणाऱ्या पालकांच्या संख्येत वाढ होते. पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाने किंवा मुलीने २४ तास उत्साहाने अभ्यास करावा आणि परीक्षेत सर्वोत्कृष्ट मार्क मिळवावे. मुले बिचारी यात भरडून जातात कारण त्यांना वर्षभर सर्वांकडून केवळ उपदेश ऐकावे लागतात. वर्ष सुरु होण्यापूर्वीच त्याबद्दल इतकी भिती दाखवली जाते की मुले त्या भीतीने आधीच तणावग्रस्त होऊन जातात. ज्यांना अभ्यास करणे फारसे आवडत नाही अशी मुले अभ्यासापासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करतात तर ज्यांना मनापासून अभ्यास आवडतो (हो, अशी ही मुले असतात) ती मुले चांगली कामगिरी करण्याच्या ताणाने बावरून जातात.

आपल्या पाल्याची शैक्षणिक कुवत ओळखून त्याच्याकडून वास्तववादी अपेक्षा ठेवणे हे पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. आपल्या पाल्याची इतर कुणाबरोबर ही तुलना करू नये. प्रत्येक मूल वेगळे आणि प्रत्येकाची क्षमता आणि अभिव्यक्ती ही वेगवेगळ्या प्रमाणात आणि वेगवेगळया क्षेत्रात असू शकते हे भान पालकांनी ठेवायला हवे. शेजारचा मुलगा गणितात १०० मार्क मिळवतो आणि आपला मुलगा खेळात राज्यस्तरीय बक्षीस मिळवतो या दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी सर्वोत्तमच आहेत. त्यांची तुलना होऊ शकत नाही. चाफा हा चाफा आहे आणि गुलाब हा गुलाब आहे. त्यांची तुलना करणे हे जसे निसर्गाविरुद्ध होईल तसेच दोन व्यक्तींची तुलना करणेदेखील. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...