आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीचे अधिकारी खटला लढण्यास यांना करतात मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादग्रस्त : एच. सी. गुप्ता, सेवानिवृत्त आयएएस
वय - ६७ वर्षे
चर्चेत का? - कोळसा खाण वाटप घोटाळ्यातील या आरोपीजवळ खटला लढण्यासाठी पैसे नाहीत.

२०११ ची घटना असेल. १९७३ च्या बॅचचे आयएएस अशोक चावला सेवानिवृत्त होत होते. यादरम्यान त्यांची कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या(सीसीआय) चेअरमनपदी नियुक्ती केली जाणार होती. त्यांचे दोन वरिष्ठ अधिकारी एच. सी. गुप्ता आणि अनुराग गोयल यांनी यावरून नापसंती व्यक्त केली होती. चावला यांना सीसीआयचे प्रमुखपद दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना रिपोर्टिंग करावे लागणार होते. गुप्ता आणि गोयल दोघेही सीसीआयमध्ये सदस्य होते.

कोळसा घोटाळ्यात नाव आल्यामुळे गुप्ता यांना सीसीआयचा राजीनामा द्यावा लागला होता. गुप्ता यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे सरकारने सुरुवातीस त्यांच्याविरुद्ध चौकशीस नकार दिला होता. मात्र, काही फाइल्स बेपत्ता झाल्यामुळे सीबीआयच्या दबावामुळे सरकारला ६८ खाणपट्ट्यांच्या १५१ कंपन्यांना झालेल्या वाटपाच्या चौकशीची परवानगी द्यावी लागली.

यूपी केडरच्या या अधिकाऱ्याची ओळख त्यांच्यातील नम्रपणामुळे होते. खटला लढण्यासाठी पैसे भरू शकत नाही,त्याऐवजी त्यांना तुरुंगात पाठवले जावे, अशी भूमिका घेतल्यानंतर गुप्ता यांचे जुने सहकारी आर्थिक मदत करण्यासाठी सरसावले आहेत. गुप्ता यांनी जामिनासाठी जातमुचलका भरला त्याचेही पैसे परत घेतले आहेत. सुनावणीदरम्यानच ते भावुक झाले होते. आपल्या बचावासाठी कोणालाही साक्षीदार म्हणून उभे करण्याची इच्छा नाही,असे त्यांनी न्यायालयास सांगितले. अखेर असे का करत आहात अशी विचारणा करत न्यायालयाने त्यांना आणखी काही अवधी दिला. दिल्लीच्या विधी साहाय्यता सेवा समितीकडून मदत केली जाऊ शकते. गुप्ता यांच्यासाठी पैसे गोळा केले जावेत यासाठी यूपी केडरच्या आयएएस अधिकाऱ्यांचा व्हॉट्सअॅपवर संदेश फिरत आहे. यासोबत त्यांना नैतिक व कायदेशीर मदत देण्याचे आवाहन केले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...