आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ प्रशासन म्हणते, या भेगा सामान्य!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील युनान विद्यापीठाच्या वसतिगृहाला पडलेल्या भेगांचे छायाचित्र सोशल मीडियावर बरेच चर्चिले गेले. अनेकांनी अशा इमारतीत विद्यार्थ्यांना कसे ठेवले, असा सवाल केला आहे. ही बाब जेव्हा विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचली तेव्हा प्रशासनाने वसतिगृहाबाबतीत कुणीही काळजी करण्याची गरज नाही. इमारतीला दिसणाऱ्या भेगा सामान्य आहेत, असे म्हटले आहे.

कुनमिंग शहरातील युनान फॉरेस्टरी टेक्नॉलॉजिकल कॉलेजच्या वसतिगृहाची ही इमारत सहा महिन्यांपूर्वीच बांधण्यात आली. काही दिवसांपासून विद्यार्थी येथे राहण्यास आले असता इमारतीच्या भिंतींना भेगा पडल्या. विद्यापीठ प्रशासनाने ती दुरुस्त केली, मात्र त्या भेगा अशा बुजवल्या की त्याचे डिझाइन मॉडर्न आर्टप्रमाणे भासू लागले. सोशल मीडियावर हे छायाचित्र व्हायरल झाल्यावर अनेकांनी विद्यार्थ्यांना तेथे न राहण्याचा सल्ला दिला. यावर विद्यापीठ प्रशासनाने, या लोकांना रचनात्मक अभियांत्रिकीचे ज्ञान नसल्याचे म्हटले आहे. इमारत स्टील फ्रेमच्या काँक्रीटने बनली असल्यामुळे बाहेरील भिंतींवर अशा भेगा पडणे सामान्य बाब आहे.

{ विबो या सोशल साइटवरील युझर्सनी विद्यार्थ्यांना नव्या डिझाइनच्या इमारतीत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

{ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हे कला विषयाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह असल्याने अशा प्रकारचे डिझाइन केल्याचे म्हटले आहे.

{ इमारतीच्या बातमीचे वार्तांकन करणारा वार्ताहर म्हणतो की, नव्या इमारतींमध्ये अशा भेगा ‘सामान्य’ असतात, याबाबत मी सांगू शकत नाही. पण २०१४ मध्ये वुहान परिसरातही एका इमारतीला अशा भेगा पडल्या होत्या. तिचे छायाचित्रही व्हायरल झाले होते.
Weibo.com
बातम्या आणखी आहेत...