आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी सुचते नवी कल्पना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅपलसारखी मोठी कंपनी, फेसबुकसारखी प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साइट व 4- अवर वर्कवीकसारखे बेस्टसेलिंग पुस्तक यांच्यात एक गोष्ट समान आहे. या सर्वांची सुरुवात एका चांगल्या कल्पनेतून झाली आहे. तुम्हीही एखाद्या चांगल्या कल्पनेची वाट बघत असाल, तर पुढीलपैकी एका पद्धतीने यश देणारी कल्पना तुम्हालाही सुचेल.
* एखादी कल्पना अपयशी ठरल्यानंतर त्यातून चांगली कल्पना मिळू शकते. त्यामुळे अपयशातही आपले डोळे, कान आणि डोके सावध ठेवा.

* एखाद्या कल्पनेतील विविधतेवर विचार करा. उदाहरणार्थ आयपॅड आणि आयफोन. दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत, पण उत्कृष्ट कल्पना आहेत.

* अनेक कल्पना तयार करा. त्यापैकी एक तरी कल्पना साकार होईल.

* कल्पना करा आणि त्यावर कृती करा. वारंवार अपयशी व्हाल, पण हताश होऊ नका. ही प्रक्रिया यशाकडे जाणारी आहे.

* नेहमी पुस्तके, वर्तमानपत्रे, ब्लॉग, इंटरनेटच्या जगात अपडेट राहा. त्यातून तुम्हाला नवी माहिती मिळेल आणि नव्या कल्पनाही सुचतील. इतरांशी बोलताना समोरील व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. एखादी चांगली कल्पना त्यातूनही नक्की सुचेल.