उज्जैन - आजच्या अत्याधुनिक जगात शीतपेय (सॉफ्टड्रींक्स) अनेकजणांचे आवडते पेय आहे. घरात कोणतेही कार्यक्रम असो, अथवा लहान मोठी पार्टी असो, अशा वेळी पाहूण्यांकरीता खासकरून सॉफ्टड्रींकच्या बाटल्या फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. काही लोकांना तर रोजच अशा प्रकारचे पेय लागते. मात्र हे पेय संपल्यानंतर या बाटल्यांना अनेक जण फेकून देतात. तसेच प्रवासाला गेले असता अनेक जण पिण्यासाठी मिनिरल वॉटरच्या पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. आज आम्ही अशाच टाकाऊ प्लास्टीकच्या बाटल्यांपासून काही तरी क्रिएटीव्ह वस्तू निर्माण करण्याबद्दल सांगणार आहोत. या क्रिएटीव्ह आयडीयातून निर्माण होणार्या वस्तू हा अत्यंत आकर्षक आणि उपयोगी ठरू शकतात. ज्यामुळे तुमचे काम तर सोपे होईलचं मात्र ह्या वस्तू तुमच्या घराचीही शोभा वाढवण्यास हातभार लावतील.
इथे आम्ही ज्या गोष्टी सांगणार आहोत त्यामुळे तुमच्यातील सृजनात्मकता वाढीस लागेल. त्याच बरोबर तुमच्या घरात सकारात्मक उर्जाही वाढण्यास मदत होईल. वास्तूशास्त्राच्या अनुसार घरामध्ये सुदंरता आणि सकारात्मकतेमुळे निर्माण होणारी उर्जा असेल तर घरातील इतर सदस्यांमध्येही सकारात्मक विचार वाढीस लागतात. सकारात्मक विचारांनी कोणतेही यश मिळवणे सोपे होते. तसेच घरात अशा निकामी बाटल्या ठेवल्याने घर तर घाण दिसतेच त्याच बरोबर उगाच घरात कचरा वाढायला लागतो. ज्यामुळे घरात नकारात्मक उर्जा नि्र्माण व्हायला लागते. आम्ही सांगत असलेल्या आयडिया वापरून तुम्ही याचा वापर याच कचर्याला तुमच्या घरातील शोभेच्या तसेच उपयोगाच्या वस्तू बनवण्यासाठी करू शकाल.
फोटो - सामान्यतः मोबाईल चार्ज करतेवेळी मोबाईल व्यवस्थित ठेवणे ही एक मुख्य अडचण असते. अशा वेळी मोबाईल खाली पडू नये याची भिती सर्वात जास्त असते. त्यामुळे या अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही प्ला्स्टीकच्या या टाकाऊ बाटलीपासून मोबाईल स्टॅंड बनवू शकता. तसेच छोटे चमचे, पेन, पेन्सील ठेवण्यासाठीही याचा उपयोग करू शकता.
पुढील स्लाईडमध्ये पहा... या टाकाऊ बाटल्यांपासून बनवण्यात आलेल्या काही सृजनात्कम कलाकृती...
हे फोटोपाहून तुम्ही अगदी सहजपणे अशा वस्तू बनवू शकाल.