आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिएटिव्ह संगीताने पॉप स्टारला राजकीय शक्ती बनवले...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलिसा हॅरिस पॅरी
अमेरिकेत में कृष्णवर्णीय लोकांसमवेत काही जटील समस्या जोडलेल्या आहेत. तरीही २०१६ सालात पॉप स्टार बेयोन्सने समस्याच बनणे आधिक पसंत केले. हा निर्णय साधा नाही. १९९०च्या दशकात किशाेरवयीन मुलींच्या डेस्टिनीज चाईल्डची ती मुख्य गायिका बनली आणि तिने जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळविली. तिचे हे स्थान तिला सैद्धांतिक पातळीवर ओेझे बनण्याच्या समस्येतून मुक्त करते. तिचा ब्रँड इतका सावधनतेने तयार केला जात आहे की, जो कृष्णवर्णीय लोकांची ताकद वाढविण्याऐवजी मुलींना आधिक ताकदवर बनवितो. चार वर्षापूर्वी सामाजिक विचारवंत एलिस कॅथमोर यांनी बेयोन्सच्या भडक व्यक्तीवादाला म्हणजे अमेरिकेतील वंशभेदाची समस्याच संपविणारा आहे.बेयोन्सने अवघड अशा राजकीय काळात कृष्णवर्णीय स्त्रीवादाचा आवाज जहीरपणे आपल्या गीतांच्या अल्बममधून मांडला. गेल्या तीन वर्षापासून अमेरिकेत कृष्णवर्णीय आफ्रिकी अमेरिकन्स आणि पोलिस यांच्यात ज्या चकमकी झडल्या,त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर वाद झाले आहेत.

अनेक पातळयांवर हा वाद विस्तारित स्वरूपात आला आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात तिच्या पहिले गाणे हिट झाल्यानंतर लेमोनेड अल्बम लोकांनी डोक्यावर घेतला. रोलिंग स्टोनने या अल्बमला सर्वज्ञत महत्वाकांक्षी स्वर असे म्हटले आहे. यानंतर अनेक संगीत पुरस्कारंाची लाटच आली. तिला ग्रॅमी पुरस्कारासाठीही नामपिर्देशन झाले. तिच्या अल्बमला सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळाला. सध्याचे पॉपस्टार डिजिटल डाऊनलोडऐवजी तिकीटे विकून आपली कमाई करत आहेत ,या काळात तिचे अल्बम हिट झाले आहेत. लेमोनेड अल्बमने २५ कोटी ६० लाख डॉलर्स जगातून मिळवून दिले. तिच्या वर्ल्ड टूरमध्ये बेयोन्सच्या आगमनाप्रित्यर्थ कृष्णवर्णीय महिलांनी जबरदस्त नृत्य सादर केले.

बेयोन्स च्या या सादरीकरणामध्ये न्यू ऑरलिन्स येथे हळूहळू पाण्यात बुडणाऱ्या यानंतर सशस्त्र पोलिसांच्या समोर नाचणाऱ्या काळया युवकांवर कॅमेरा रोखला जातो. त्याचे हात फैलावलेले आहेत आणि पोलिसांनी आपले हात हवेत उंचावले आहेत. बेयॉन्स आणि त्यांच्या नृत्य पथकाने कृष्णवर्णियांसाठी आवाज उठवणाऱ्या ब्लॅक पँथर्सना श्रध्दांजली वाहिली. त्यावर तिखट प्रतिक्रिया आल्या. न्यूयॉर्कचे माजी महापौर रुढी गुलियानी यांनी हा शो म्हणजे भावना भडकावणारा असल्याची टीका केली. पोलिसांनी सांगितले की बेयॉन्सने हे पोलिसांना िचथावणारे कृत्य केले आहे. पोलिस संघटनांनी आपल्या सदस्यांना बेयान्सच्या टूरमध्ये सुरक्षा देऊ नका, असे आवाहन केले.लेमोनेड अल्बम म्हणजे कृष्णवर्णीय महिलांचा आवाज उठवणारे माध्यम आहे. त्यातून निग्रो महिलांचे शोषण आणि त्यांच्या अधिकारांची आठवण करून दिली जाते.
बातम्या आणखी आहेत...