मगरीची 350 पिल्ले / मगरीची 350 पिल्ले वेळेआधीच जन्मली

दिव्य मराठी नेटवर्क - नवी दिल्ली

Jun 07,2011 02:41:25 PM IST

एका मगरीने 350 पिल्लांना दोन जून रोजी जन्म दिला. सर्व पिल्ले सुखरूप असून सध्या ती दिल्लीमध्ये आहेत. चंबळअभयारण्यातील देवरी इको सेंटर येथून आणण्यात आलेल्या मगरीच्या पाचशे अंड्यांपैकी साडेतीनशे पिल्लांनी जन्म घेतला आहे. या अंड्यांतून वेळेच्या आधीच मगरीची पिल्ले जन्म घेतील, असा अंदाज तज्ज्ञांनी आधीच वर्तवला होता.

मगरीच्या अंड्यातून साधारणपणे 65 दिवसांनंतर पिल्ले जन्म घेतात. मात्र, या वेळी मगरीची 350 पिल्ले 45 ते 50 दिवसांमध्येच बाहेर आली. वाढत्या तापमानामुळे वेळेच्या आधी या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतील, असा अंदाज शास्त्रज्ञांना आधीच होता.

नैसर्गिक प्रक्रिया कशी आहे? : मादी मगर 14 एप्रिलच्या दरम्यान अंडे देते. त्याच्या 65 दिवसांनंतर या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. शास्त्रज्ञांच्या मते, मगर मादी या आधी 25 एप्रिलपर्यंत अंडे देत होती. मात्र, काही काळापासून मगर मादी खूप लवकर अंडी द्यायला लागली आहे.

या वेळी काय झाले? : या वेळी 14 एप्रिलच्या दरम्यान मादी मगरीने अंडी दिली. त्यांना 15 ते 20 मेपर्यंत देवरी येथे आणण्यात आले. साधारणपणे 46 दिवसांनी म्हणजेच दोन जून रोजी मगरीच्या 350 पिल्लांनी जन्म घेतला. सध्या ही पिल्ले सुरक्षित असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

असे का झाले? : तापमानात होणार्‍या वाढीमुळे अंड्यांवर परिणाम होतो आणि अंड्यांमधून पिल्ले लवकर बाहेर येण्याची शक्यता आहे, असे चंबळ अभयारण्यातील अधिकार्‍यांनी आधीच सांगितले होते. त्याचप्रमाणे 10 ते 15 दिवस आधीच या पिल्लांनी अंड्यातून जन्म घेतला.

X
COMMENT