आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तप्त तारेने बर्फाची लादी कापण्याचा अनोखा प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्फाच्या लादीला जर हिटरवर ठेवले तर ती जलद विरघळणार हे सांगायला नकोच. मात्र बर्फाची लादी कापण्याचा प्रयत्न केला तर त्यातून काय निष्पन्न होईल हे सांगणे जरा कठीण आहे. प्रयोगशाळेत विविध प्रकारचे प्रयोग करुन त्यांचे प्रात्यक्षिकासह निष्कर्ष यूट्युबवर अपलोड करणाऱ्या ग्रँट थॉम्पसन यांनी बर्फाची लादी कापण्याच्या प्रयोगाचाही व्हिडिओ लोकांबरोबर शेअर केला आहे. हिटरसारख्या यंत्राला िवशिष्ट तापमानापर्यंत गरम केले जाते. हिटरवर एक तार बांधलेली असून ती हिटर सुरु होताच गरम होते. मग त्या तारेवर बर्फाची लादी ठेवून ती लादी कापण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र या प्रयत्नात थोड्याच वेळात ती तार तुटते. याबाबत थॉम्पसनने म्हटले आहे की, बर्फाचे तुकडे करणे, तो विरघळवणे तुलनेने सोपे आहे, मात्र बर्फ कापणे तितकेसे सोपे नाही.
बातम्या आणखी आहेत...