आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dalit Industralist Who Made Their Own Impair Without Helping

कोणत्याही मदतीविना हजारो कोटी कमावणारे दलित उद्योगपती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील भारताच्या उच्चाधिकारी देवयानी खोब्रागडे या दलित नसत्या तर हे प्रकरण इतके प्रकाशझोतात आले नसते. अमेरिकेने त्यांना चुकीची वागणूक दिली. हे चुकीचे असले तरी त्यांना पात्रता नसतानाही आदर्श सोसायटीत मिळालेल्या फ्लॅटची चर्चाही झाली नाही. त्यांचे वडील आयएएस अधिकारी होते; पण केवळ राजकीय किंवा प्रशासकीय सेवेतील पार्श्वभूमी असणारे दलितच प्रभावशाली असतात असे नाही. त्याशिवायही इतर अनेक दलित आहेत, जे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. तेही आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते; पण परिश्रम आणि हिमतीने त्यांनी समाजात आपले स्थान निर्माण केले. अशाच काही लोकांच्या यशोगाथा...
दोन दिवस उपाशी राहिले, आज कोट्यवधींची संपत्ती
अशोक खडे, सीईओ, दास ऑफशोर इंजिनिअरिंग
अशोक खडे यांचे वडील बूट, चप्पल दुरुस्त करायचे. सांगली जिल्ह्यातील पेठमध्ये राहणारे अशोक दलित असल्याने त्यांना शाळेत किंवा मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. एकदा पावसाळ्यात अशोक यांच्या आईने त्यांना पीठ आणण्यासाठी पाठवले. तेव्हा परत येताना ठेच लागल्याने पीठ चिखलामध्ये पडले. अशोक आणि त्यांच्या पाच भावांसह पूर्ण परिवाराला त्यानंतर दोन दिवस उपाशी राहावे लागले. त्या वेळी त्यांना जाणीव झाली की जीवनात काही तरी वेगळे केले नाही, तर त्यांनाही आयुष्यभर वडिलांप्रमाणे बूट-चपला दुरुस्त कराव्या लागतील. त्यामुळे त्यांनी जवळच्या एका गावातील शाळेत प्रवेश घेतला. दहावीनंतर शिक्षणाचा खर्च करण्याची त्यांच्या कुटुंबाची कुवत नव्हती. दोन भाऊ आधीच मुंबईमध्ये माझगाव डॉकवर काम करत होते. ते वेल्डिंग करायचे. अशोकलाही याच कामाला जुंपण्यात आले. त्यामुळे दिवसभर काम आणि रात्री अभ्यास करत त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा मिळवला. ते सगळे एकाच खोलीत राहायचे. त्यांच्याबरोबर अनेक नातेवाईकही होते. त्यामुळे अशोक यांना झोपण्यासाठी पाय-यांखाली जागा मिळायची. तेथेच त्यांनी अनेक मोठी स्वप्ने पाहिली अन् ती साकारही केली. डॉकवर त्यांना वेल्डिंगचे काम मिळायचे. त्या ठिकाणी त्यांनी आधी लहान कंत्राट मिळवले आणि नंतर मोठी कामे हाती घेतली. 1991 मध्ये त्यांनी स्वत:ची कंपनी तयार केली. त्यानंतर समुद्रातून तेल काढण्यासाठी वापरले जाणारे प्लॅटफॉर्म तयार करायचे काम सुरू केले. त्यांचे काम इतके वाढले की आज त्यांच्या कंपनीत साडेचार हजार कर्मचारी काम करतात. त्यांच्या कंपनीची उलाढाल एक हजार कोटींवर गेली आहे. आता त्यांना शाळांमध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले जाते; पण त्यांनी व्हिजिटिंग कार्डवर अशोक के. असे नाव लिहिले आहे. व्यवसायात जातीचा अडसर येऊ नये, अशी इच्छा असल्याचे ते सांगतात.