Home | Divya Marathi Special | dangerous gulf jpsh ship coming in gujrat

विषारी रसायनयुक्त 'गल्फ जोश' जहाजापासून धोका

agency | Update - Jun 03, 2011, 06:35 PM IST

लंडनच्या रिफिगर कंपनीचे रसायनयुक्त जहाज गुजरातच्या अलंग नदीकिनारी येत आहे. 'गल्फ जोश' नामक हे जहाज तोडण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.

  • dangerous gulf jpsh ship coming in gujrat

    ship_258गांधीनगर - लंडनच्या रिफिगर कंपनीचे रसायनयुक्त जहाज गुजरातच्या अलंग नदीकिनारी येत आहे. 'गल्फ जोश' नामक हे जहाज तोडण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे जहाज विषारी रसायनयुक्त असल्यामुळे ते फोडल्यानंतर सार्वजनिक जीवन, आणि पर्यावरण, तसेच समुद्री जीवांना धोका पोहोचण्याची शक्यता लक्षात घेता अमेरिका, व्हिएतनाम, बांगलादेशासह जगातल्या इतर देशांनी आपल्या किना:यावर हे जहाज तोडण्यास नकार दिला आहे.

    वर्ष २७पासून प्रयत्न विषारी रसायन मर्केपंटससहित अन्य घातक रसायनयुक्त जहाज तोडण्यासाठी रिफिगर कंपनी २७ पासून प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने जगातल्या अनेक देशांची मदत मागितली होती. मात्र, जहाजातील विषारी रसायनांमुळे सागरी तसेच सार्वजनिक आयुष्य प्रभावित होण्याची शक्यता लक्षात घेता अनेक देशांनी तर आपल्या सागरी हद्दीत शिरण्यासही या कंपनीला मज्जाव केला आहे. मात्र, असे असतानाही गुजरातच्या अलंगमध्ये हे जहाज तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, स्थानिक लीला ग्रुपने या वृत्ताचा इन्कार केला आहे. अर्थात केंद्र सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव आलेला नसला तरी असा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

    आधी केंद्र सरकार, नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ
    मला याबाबतीत अजून तरी काही माहिती नाही; परंतु कानावर येणा:या बातम्यांवरून असे लक्षात येते की, या दिशेने प्रयत्न होऊ शकतात. पर्यावरणाशी संबंधित काही मुद्दा असेल तर मी माझ्या अधिकाऱ्यांना त्यासंदर्भात सूचना देईन, असे गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. के. यू. मिस्त्री यांनी सांगितले. याबाबतीत गुजरात मेरिटाईम बोर्डची भूमिका आमच्यापेक्षा आधी आणि महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. सामान्यत: अशा विषारी रसायनांच्या जहाजांना गुजरातच्या सागरी सीमेत प्रवेश दिला जात नाही. त्यासाठी आधी केंद्र सरकारची आणि त्यानंतर मेरिटाईम मंडळाची परवानगी घ्यावी लागते, असेही त्यांनी सांगितले.Trending