आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-चीन दरम्यान सीमारेषा वाद 100 वर्षांपूर्वीचा आहे. 1914 मध्ये शिमला करारात तिबेट व भारतातील ब्रिटिश सरकारने सीमा रेषा निश्चित केली होती. तिला मॅकमोहन रेषा म्हटले होते. चीन ही रेषा मानत नाही. 1962 मधील भारत-चीन युद्धही सीमारेषेच्या वादातूनच झाले होते. त्यावेळी झालेल्या करारानुसार, दोन्ही देशांतील लष्कर जेथे तैनात होते, तिलाच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) मानले गेले. तेव्हा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सीमा निश्चित करण्यात आली नव्हती. म्हणून तो वाद आजही कायम आहे. सुमारे चार हजार किमी लांबीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा
लडाख, काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशातून जाते. अक्साई चीन हा जम्मू-काश्मीरच्या उत्तर-पूर्वेकडील भला मोठा निर्जन परिसर आहे. यावर भारताचा दावा असला तरी तो चीनच्या ताब्यात आहे. याच प्रकारे अरुणाचल प्रदेशावर चीनचा दावा आहे, पण सध्या तो भारताच्या नियंत्रणाखाली आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील नवा वाद राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अहवालामुळे सुरू झाला आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, चीनचे सैन्य भारतीय सैनिकांना गस्त घालू देत नाही. पण समस्या एवढी गंभीर नाही. 1999 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान कारगिल युद्ध सुरू असताना चीनने एलएसीपर्यंत रस्ते बांधून सामरिक बाजू बळकट केली होती. आता चीनचे सैन्य सीमारेषेवर भारतीय सैन्यापेक्षा लवकर पोहोचते. प्रत्यक्ष उपस्थिती नसल्यामुळे आपला दावा कमकुवत ठरतो. 15 एप्रिलला चिनी सैन्य 19 किलोमीटर आत घुसल्याचा वादही याच प्रकारातील होता. हा वाद असाही समजून घेता येईल की, भारत दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये एलएसीच्या तीन चिन्हांवर दावा करतो. ते म्हणजे त्रिशूल, रेड हिल आणि ब्राऊन हिल. गस्त घालण्यासाठी भारतीय सैन्य रेड हिल किंवा ब्राऊन हिलच्या दिशेने जाते, तेव्हा चांगल्या रस्त्यांमुळे चिनी सैन्य तेथे आधी पोहोचते. भारतीय सैनिक तेथे नसल्यामुळे भारताचा दावा कमकुवत ठरतो. भारतानेही नवे रस्ते आणि हवाई तळ बांधण्याचा वेग वाढवला आहे. पण यामुळे समस्या सुटणार नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा स्पष्टपणे निश्चित होईपर्यंत ही समस्या कायम राहणार. यासाठी दोन्ही देशांदरम्यान विशेष शिष्टमंडळाच्या चर्चेसाठी 16 फेºया झाल्या. अनेक वाद मिटले, पण दोन्ही देशांना मान्य असा कोणताही मार्ग निघाला नाही.