आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: डोळे दिपवणारा 15 लाखांचा पेन, मौल्यवान बेल्ट आणि सुवर्ण पत्ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एखादा पेन किती महागडा असू शकतो... एक हजार, दहा हजार, पन्नास हजार किंवा जास्तीत जास्त दोन-तीन लाखांचा. परंतु, तुम्ही कधी 15 लाखांचा पेन बघितला आहे... जर नसेल बघितला तर दिल्लीत तुम्हाला हा पेन बघायला मिळू शकतो. हा एखादा सर्वसामान्य पेन नाही. यात तब्बल 700 मौल्यवान आणि अमुल्य हिरे लावण्यात आले आहेत. यामुळे हा जगातील सर्वांत महागडा पेन ठरला आहे.

केवळ पेनच नव्हे तर जगातील सर्वांत महागडे बेल्टसुद्धा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. पुरुषांच्या बेल्टची किंमत एक लाख दहा हजार तर महिलांच्या बेल्टची किंमत सुमारे एक लाख 65 हजार रुपये आहे. या सगळ्यांमध्ये ब्रेसलेटही खास आहे. त्याची किंमत एक लाख 65 हजार रुपये आहे.

दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्वेलरी अॅण्ड जेम फेअर 2013 मध्ये ही महागडी आभुषणे प्रदर्शित करण्यात आली आहेत.

पुढील स्लाईडवर वाचा, या मौल्यवान वस्तूंच्या किंमतीविषयी आणि बरेच काही...

फोटो-भूपिंदर सिंह