आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाच्या वल्गनेत कृतिशून्य मोदी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ.मनमोहन सिंग यांची सुरक्षा अन्य बाबींसाठी महिन्याला कोटींचा खर्च येत होता. मोदींनी ही बाब नजरेत आणून दिली. मोदी खर्च कमी करतील, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांचा महिन्याचा खर्च कोटी आहे. मोदींच्या विदेशवा-यांची नोंद गिनीज बुकच्या रेकॉर्डमध्ये होऊ शकते.
गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ असा पाच महिने खेळ खेळल्यानंतर संयुक्त पुरोगामी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याशिवाय पर्याय नाहीच याबाबत मोदींनाही खात्री पटली आहे. गेल्या पाच महिन्यांत मोदी सरकारवर नजर टाकली तर उथळ पाण्याला खळखळाट फार यापेक्षा दुसरे चित्र नव्हते.
वल्गना करण्यातमोदींचा हातखंडा आहे.100 दिवसांत काळा पैसा परत आणण्याचे वचन देणारे मोदी, डॉ. मनमोहन सिंग सरकारप्रमाणे खर्चाची उधळपट्टी होणार नाही हे सांगणारे, मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यांना कात्री लावणारे, पारदर्शकतेचा आव आणणारे या गोष्टी केवळ ऐकायला बऱ्या वाटल्या. मात्र, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून नावारूपास आलेल्या भारताला छेद देणारी मोदींची कृती आहे.
मीडियाद्वारे मोदींच्या खर्चाची आकडेमोड होत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची सुरक्षा आणि अन्य बाबींसाठी महिन्याला कोटी रुपयांचा खर्च येत होता. मोदींनी ही बाब नजरेत आणून दिली. मोदी खर्च कमी करतील, अशी अपेक्षा होती. परंतु त्यांचा महिन्याचा खर्च कोटी रुपये आहे. मोदींच्या विदेशवाऱ्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होऊ शकले. याआधी या गरीब देशातील एकाही पंतप्रधानाने असले धाडस केले नव्हते. विदेशात जाऊन ‘मोदी..मोदी..मोदी..’ या घोषणा ऐकताना पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसतो. मात्र, या घोषणाबाजीचे कार्यक्रमही पूर्वनियोजित असतात. गेल्या आठवड्यात मंत्र्यांना विदेशवाऱ्यांना विरोध करणारे मोदी लगेच दुसऱ्या दिवशी ‘जी-20’ मध्ये सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाले. या परिषदेतील सहभागाने काळा पैसा भारतात लवकर परत येईल, असे विडंबन भाजपचेच काही मंत्री करीत आहेत. पाच महिन्यांपूर्वीचा मोदींचा झंझावात आणि 100 दिवसांचे त्यांचे मधुचंद्राचे दिवस येथपर्यंत मोदी प्रेम ठिक होते. परंतु आता स्वपक्षातील लोकांनाच मोदींचे वागणे अतिरेकी असल्याचे जाणवत आहे.
मोदींनी गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करून ६६ जणांचे मंत्रिमंडळ केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाच्या जवळपास हे संख्याबळ पोहोचले आहे. छोट्या कुटुंबांच्या आणि अनावश्यक खर्चाच्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. विस्ताराचे एकदाचे ठिक आहे, परंतु यातही अनेकांसोबतची त्यांची सूडभावना दिसून आली. केवळ पाच महिन्यांतच अनेक मंत्र्यांचे विभागच बदलले आहे. डॉ. हर्षवर्धन हे आरोग्यमंत्री होते त्यांच्याकडून ते खातेच काढून घेतले. रेल्वेमंत्री असलेले सदानंद गौडा यांच्या संपत्तीत अमाप वाढ झाल्याचे दिसून आले तशातून त्यांचा मुलगा कार्तिक याचेवर एका अभिनेत्रीवर बलात्काराचा आरोप झाला. नव्या विस्तारात मोदींनी गौडा यांचे रेल्वे खाते काढून थेट कायदामंत्री करून टाकले. ज्याच्यावर ठपका ठेवण्यात आला अशा या कायदामं-यांचे कोण काय वाकडे करू शकतो? भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ लोकसभा सदस्य आहेत, त्यांनाही मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. परंतु केवळ उद्धव ठाकरे यांची वाट लावायची म्हणून मोदींनी शिवसेनेत झीरो असलेल्या सुरेश प्रभूंना हीरो केले. शिवसेनेने त्यांना मंत्री करावे, असा अट्टाहास मोदींनी धरला. ठाकरे यांनी नकार दिला ती बाब अपमानास्पद समजून मोदींनी प्रभूंना थेट रेल्वेमंत्री केले. प्रभू हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. आता त्यांना आयतेच राज्यसभा सदस्यत्व मिळेल. एखाद्याला संपवायचे असल्याने अन्य व्यक्तींचा कसा लाभ होतो ते यावरून दिसून आले. हिंदूनंतर या देशात मुसलमान बहुसंख्य आहेत. परंतु मोदी या समुदायाला जवळ करण्यास कधीच इच्छुक नसतात. भाजपमध्येही अनेक ज्येष्ठ मुसलमान नेते आहेत. 15 टक्के मुसलमान असलेल्या या देशात 66 जणांच्या मंत्रिमंडळात केवळ दीड मुसलमान मंत्र्यांचा समावेश आहे. नजमा हेपतुल्ला कॅबिनेट मंत्री आणि विस्तारात राज्यमंत्री झालेले मुख्तार अब्बास नकवी! दोघांकडेही अल्पसंख्य विभागाचे खाते देण्यात आले आहे. तर अन्य मंत्री कोण-कोणत्या धर्माचे-जातीचे यावर दृष्टिक्षेप टाकला तर मोदींच्या मनात नेमके काय दडले आहे त्याची ओळख पटते. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांना राज्यमंत्री करण्यात आले. त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत असताना संपूर्ण मीडियाने कोळसा घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे खा. अहिर म्हणून ओळख करून दिली. 2007 पासून अहिर हे कोळसा प्रकरणी पाठपुरावा करीत आहेत. नितीन गडकरी हे पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हा कुठे अहिरांचे हे प्रकरण राष्ट्रव्यापी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अहिरांचे नागपूरच्या सभेत कौतुक केले. अहिरांकडून ही समाजसेवा घडली असल्याचे सांगितले. कोळसा प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहाेचले. अनेकांच्या मानेवर टांगत्या तलवारी आहेत. यात कॉँग्रेसचे नेतेच आहेत, असे नाही अनेक उद्योगपती असे आहेत की जे मोदींच्या अवतीभाेवती पिंगा घालीत असतात! ही मंडळी संकटात येणे हे मोदी सहन करू शकणार नाहीत. ज्यांनी कोळसापट्टे मिळवून घेतले त्यांना राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून अनधिकृतपणे कर्जपुरवठा झाला आहे. अहिरांच्या मते यातही कोट्यवधींचा भ्रष्टाचार आहे. हा घोटाळा ते लवकरच बाहेर काढणार होते. मात्र आता मंत्री झाल्याने त्यांच्यावर काही मर्यादा आल्या आहेत. त्यांना कोळसा मंत्रिपद देण्याचे आश्वासन मिळाले होते. परंतु त्यांना रसायन खात्याचे राज्यमंत्रिपद देऊन मोदींनी त्यांचे तोंड बंद केले आहे. काही प्रकरणे उघड झालेले बरे असते. अहिर देशसेवा करायला निघाले होते. त्यासाठी त्यांना मंत्रिपदाचे बक्षीस मिळणे त्यांच्या ज्येष्ठनेनुसार नैसर्गिक होते. मात्र, ज्या विषयाचा त्यांचा सूक्ष्म अभ्यास आहे. ते डावलून असे खाते त्यांच्यावर थोपवले की त्यांनी अन्य घोटाळ्यांच्या विषयाकडे लक्ष देऊ नये! चतुर राजकारणी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दूरदृष्टी म्हणावी लागेल!