आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसंगानुरूप पोशाख: डेनिम वापराच्या खास उन्हाळी पद्धती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात साडी, जपानमध्ये किमोनोज, ऑस्ट्रियात चिको मार्क्स हॅट्सचे जे महत्त्व आहे तेच महत्त्व अमेरिकेत डेनिमचे आहे. जीन्सची सुरुवातच येथून झाली. सर्वात जुनी जीन्स, बूट कट जीन्स, नवी जीन्स, बेस्ट फिट जीन्स वा महागडी जीन्स, हे सर्व प्रकार डेनिम चाहत्यांच्या वॉर्डरोबमध्ये हमखास दिसतात. मात्र डेनिमचा विषय असेल तर जीन्सचा विचार सर्वप्रथम येतो. डेनिम म्हणजे केवळ जीन्स नव्हे. डेनिम शर्टड्रेस, डेनिम शर्ट किंवा डंग्री देखील याचे पर्याय आहेत. डेनिमपासून चिक्कार प्रकारचे ड्रेस तयार होतात. आज अशाच डेनिम ड्रेसेसविषयी जाणून घ्या. सुट्यांमध्ये याचा चांगला वापर करता येतो....
शर्टड्रेस- ब्लू डेनिम शर्ट ड्रेस, याला फ्लोरल स्कार्फ, बांगड्या आणि टॅन बागसोबत वापरता येईल. याला मॅक्सी ड्रेस वा मिडीड्रेस सोबतही वापरता येते. तुमची शरीरयष्टी अॅथलेटिक असेल तर हे वापरताना वेस्टलाइनवर बेल्ट चांगला दिसेल. उन्हाळ्यात यासोबत वाइड ब्रिम हॅट वापरा. त्यामुळे कूल आणि आरामदायी लूक मिळतो.
शर्टड्रेस- जीन्स तर अनेकदा वापरात येते. या वेळी त्यासोबत थोडी क्रिएटिव्हिटी दाखवा. जुन्या जीन्सला योग्य ठिकाणी रीप करा. अँकल्सपर्यंत त्याला रोल करून स्ट्रेट स्टाइल वापरा. रिप्ड जीन्स सध्या ट्रेंडमध्ये आहे. अनेक सेलिब्रिटी या प्रकारच्या जीन्सचा वापर करत आहेत.
प्लेन डेनिम शर्ट- बेसिक जीन्सवर स्काय ब्लू डेनिम शर्ट टक करून वापरा किंवा डेनिम शर्टऐवजी श्रग देखील वापरू शकता. मॅक्सी ड्रेस किंवा गंजीच्या वर डेनिम शर्ट सुंदर दिसतो. उन्हाळ्यात या स्टाइलमुळे कूल लूक मिळू शकतो. रंगीत प्लाजो वा मॅक्सी ड्रेससोबतही हे वापरता येते.
डंग्री - काही वर्षांपूर्वी पोल्का डॉट्सची डंग्री वापरली जात असे. कदाचित ब-याच जणींनी लहानपणी पोलका डॉट्सची डंग्री वापरलीही असेल. याला पुन्हा वापरा. या वेळी पांढ-या शर्टचा वापर करा. स्लीम टॅन कलर बेल्ट सोबत तुम्ही डंग्री ट्राय करू शकता. सडपातळ असाल तर गंजीवर डंग्री वापरा. डंग्री कधी चुरगळत नाही. त्यामुळे कधीही, कुठेही वापरायला ती सोपी आहे.

दुपारी १२ च्या आधी वजन कमी करण्याच्या पद्धती
>सकाळी शक्य तितक्या लवकर पडदे बाजूला सारा. प्रकाश आत येऊ द्या. त्यामुळे मन प्रसन्न राहते. शक्ती मिळते. सकाळच्या सूर्यप्रकाशात राहणा-या व्यक्तीत बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) कमी असते, असे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.
> नाष्ट्यात फक्त कार्बोहायड्रेट खाण्यापेक्षा प्रथिनांचाही समावेश करा. त्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण संतुलित राहते. नाष्ट्यात अंड्याचा पांढरा भाग, होलग्रेन टोस्ट, योगर्ट किंवा फळ खा. त्यामुळे ऊर्जित राहता येते.
>सकाळी संगीत ऐकत धावण्याचा वा इतर व्यायाम करा. त्यामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो. सकारात्मकता वाढते. रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यासाठी सकाळी १० मिनिटे योग किंवा स्ट्रेचिंग करा.
बातम्या आणखी आहेत...