आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकासाच्या मॉडेलमध्ये कोण श्रेष्ठ; गुजरात की बिहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. अर्मत्य सेन आणि प्रा. जगदीश भगवती या दोन प्रख्यात अर्थशास्त्रज्ञांमध्ये सध्या वाद सुरू आहे. त्यांच्या वादाचे केंद्र आहे, विकासाच्या मॉडेलमध्ये कोण श्रेष्ठ, गुजरात की बिहार ?

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांमधील प्रतिस्पर्धा सर्वज्ञात आहे. दोघेही आपआपल्या सर्मथकांमध्ये विकासाचे रोलमॉडेल आहेत. मोदी आणि नितीशकुमारांमधील संघर्ष हा आपल्या राज्याची विकासाची कथा देशासमोर मांडत राष्ट्रीय पटलावर स्वत:ला मोठा नेता म्हणून स्थापित करण्यासाठी आहे. सयुंक्त जनता दलाने एनडीएमधून बाहेर पडत आपला सवतासुभा मांडला आहे. त्या वेळेपासून हा संघर्ष आणखी धारदार झालेला आहे. अशा स्थितीत देशाच्या विकासासाठी नेमके कोणते मॉडेल उपयुक्त ठरेल गुजरात की बिहार हा प्रश्न उपस्थित होतो. अनेक आर्थिक तज्ज्ञ या वादाला निर्थक मानत असले तरी गेल्या काही महिन्यांपासून या दोन मॉडेलविषयी चर्चा सुरू आहे. याच कारणामुळे या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिकतज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. नितीशकुमारांच्या नेतृत्वाखाली बिहार एक मागास राज्यातून प्रगतिपथावर येण्यात यशस्वी झाला आहे, तर मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात गुजरातची वेगाने प्रगती करणारे राज्य अशी प्रतिमा झाली आहे.

गुजरात की बिहार या वादाच्या सुरुवातीस प्रा.जगदीश भगवती आणि डॉ.अर्मत्य सेन यांच्यामधील वादाला जोडून पाहिले जात होते. प्रा. भगवती विकासालाच देशातील सर्व समस्यांवर एकमेव तोडगा मानतात. त्यांचा हा दावा गुजरातच्या वायब्रेंट गुजरातकडे इशारा करणारा आहे. तेथे खासगी गुंतवणुकीच्या माध्यमाने विकासावर जोर देणारे मॉडेल आहे, परंतु अर्मत्य सेन सरकारी प्रयत्नाने विकासाचे फायदे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास प्राधान्य देतात. बिहारचे मॉडेल अशा स्वरूपाचेच आहे. बिहारने सरकारी पैसा खर्च करून राज्याच्या विकास दराला एवढय़ा उंचीवर आणून ठेवले आहे.

गुंतवणूक
एखाद्या राज्यात किती गुंतवणूक होते त्यावर त्या राज्याचा विकास अवलंबून असतो. जास्त गुंतवणूक हा त्या राज्याची स्थिती चांगली असल्याचा निर्देशक असतो. काही दिवसांपूर्वी असोचॅमने एक अहवाल प्रकाशित केला होता. त्या अहवालात मार्च 2003 ते मार्च 2013 मध्ये या दोन्ही राज्यांत झालेल्या गुंतवणुकीसंदर्भात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

बिहार आघाडीवर
सार्वजनिक गुंतवणुकीचा दर बिहारात दरवर्षी 20 टक्के इतका होता. तर या कालावधीत गुजरातमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण 14.1 टक्के इतके होते.

गुजरात आघाडीवर
खासगी गुंतवणुकीचा विचार केल्यास बिहारमध्ये या काळात गुंतवणुकीचा दर 104.5 टक्के, तर गुजरातमध्ये 31.4 टक्के राहिला होता. एकूण रकमेच्या बाबतीत गुजरात आघाडीवर होता. या कालावधीत गुजरातमध्ये बिहारच्या तुलनेत चार पट जास्त गुंतवणूक झाली.

निष्कर्ष

1 . गुजरातमध्ये विकासाचे वातावरण पहिल्यापासून होते, परंतु नरेंद्र मोदींच्या काळात यात काही प्रमाणात वाढ झाली.
2. नितीशकुमारांच्या पूर्वी बिहार अतिमागास राज्य होते. 2005 मध्ये नितीशकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याने वेगाने विकास केला. 2001-11 या दशकात बिहार गुजरातच्या तुलनेत मागे होता.
3. 2011 मध्ये बिहारचा विकासदर (10.9 टक्के) गाठत गुजरात विकासदरात ( 9.6 टक्के ) मागे टाकले.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणतात प्रा.जगदीश भगवती आणि डॉ.अर्मत्य सेन