आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devid Whan Drehle Artical On Hilary Clinton Candidature To President Election

हिलरी यांच्या उमेदवारीचे पारडे जड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी अजून 2016ची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला नाही. अलीकडे अशा बातम्या झळकल्या ज्यात निवडणूक प्रचाराच्या तयारीचे संकेत मिळाले आहेत. क्लिंटन यांचे निकटवर्तीय सांगतात, त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. मग प्रश्न उपस्थित होतो की, ओबामा यांच्या राजकीय थिंक-टँकशी संबंधित उच्चपदस्थ कर्मचारी क्लिंटनसमर्थक गोटात नोकरीसाठी का जात आहेत? सूत्रांच्या मते, क्लिंटन आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील आठवणी लिहिण्यात मग्न आहेत. कुटुंबाच्या धर्मादाय प्रतिष्ठानसाठी निधी गोळा करण्यात त्यांचा वेळ जातो. त्यांच्या निकटवर्तीयांपैकी एकाने सांगितले की, क्लिंटन संकुचित नाहीत. काही निर्णय न झाल्याचे त्या सांगतात म्हणजे खरोखरच त्यांनी निर्णय घेतला नसेलच, हे स्पष्ट आहे.
क्लिंटन यांचे कट्टर समर्थक निवृत्त जनरल वेस्ली क्लार्क यांनी अलीकडेच आपल्या जुन्या सहका-यांना ई-मेल पाठवून क्लिंटन यांच्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या ई-मेलला काय म्हणायचे? खरे म्हणजे क्लिंटन यांच्या रूपात अमेरिका एक दुर्मिळ राजकीय घटना अनुभवत आहे. हिलरी यांना नव्या उपाधीची गरज आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी पती बिल क्लिंटन यांच्या दोन आणि स्वत:च्या एका निवडणूक प्रचार कार्यक्रमाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यातून त्या राजकीय पटलावर जगभरात प्रसिद्ध झाल्या आहेत. राजकारणामुळे त्यांना खासगी आयुष्य आणि उमेदवार अशी स्वतंत्र ओळख राहिली नाही.
गव्हर्नर, सिनेटर, उपाध्यक्ष यांसारख्या व्यक्तींना अध्यक्षाची निवडणूक लढवण्यापूर्वी अनेक प्रकारच्या दबावांखालून जावे लागते. क्लिंटन यांच्याबद्दल असे नाही. उमेदवारासाठी आवश्यक असलेल्या सर्व पात्रता त्यांच्यात आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे नाव सुपरिचित आहे. देशभरात त्यांना लोक ओळखतात. त्यांच्यासाठी वर्गणी देणा-यांची संख्या कमी नाही. अनुभवी लोकांचा ताफा आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या दोन पिढ्यांचे निवडक सेनापती आहेत. त्यांच्यासाठी राजकीय कृती समिती प्रायॉरिटीज् यूएसए अ‍ॅक्शन आणि थिंक टँक-सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस काम करतील. महिलांचे नेटवर्क एमिलीज लिस्टदेखील हिलरी क्लिंटन यांच्यासोबत आहे.
हिलरी अध्यक्षपदाच्या उमेदवार घोषित झाल्यास त्यांचा वेग कमी होऊ शकतो. निर्णय नसलेल्या काळात त्यांच्या दिनचर्येत लवचीकता येईल. त्यांना इंटरनेटच्या कोणत्याही विवादाचे उत्तर देण्याची गरज नाही. रिपब्लिकन पक्षाच्या हल्ल्यांपासून त्या सुरक्षित राहतील. असे किती वेळ चालेल? गेल्या वर्षी एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या, त्या 2014 मध्ये निर्णय घेतील. 2016 साठी क्लिंटन यांची उमेदवारीची घोषणा झालेली नाही. मात्र, वॉशिंग्टनमध्ये राजकीय ता-यांवर त्यांचा प्रभाव दिसत आहे. डेमॉक्रेटिक पक्षात बहुतांश सहका-यांना क्लिंटन यांना पुढे करण्यात रस आहे. मेसॅच्युसेट्सच्या सीनेटर एलिझाबेथ वॉरेन कित्येक वेळा म्हणतात, त्या क्लिंटन यांना आव्हान देणार नाहीत. न्यूयॉर्कच्या सीनेटर किर्स्टन गिलिब्रेंड आणि मिनेसोटाच्या एमी क्लाउबुचर म्हणतात, त्या क्लिंटन यांच्या उमेदवारीला पाठिंबा देतील. या सीनेटर्स अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.
क्लिंटन यांच्या उमेदवारीचा निर्णय त्यांचे कुटुंबीय आणि विश्वासू मित्रमंडळी घेतील. पती बिल क्लिंटन, मुलगी चेल्सिया आणि दीर्घ काळापासून त्यांचे स्टाफ मेंबर राहिलेले केप्रिसिया मार्शल, मीलेन व्हेरवीर, चेरिल विल्स आणि मॅगी विल्यम्स यांचा सल्ला निर्णायक ठरेल. पॉलिटिको या नियतकालिकात प्रकाशित एका बातमीनुसार मिल्स आणि विल्यम्स हिलरी क्लिंटन यांच्या उमेदवारीचे समर्थन करत नाहीत. चेल्सियाने सार्वजनिक स्वरूपात सांगितले आहे, तिला वाटते की, कोणताही मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर आपल्या आईने विचारात पूर्णपणे सुस्पष्टता
असू द्यावी.
- सोबत मायकेल क्राउली, जे न्यूटन- स्मॉल, जेके मिलर
हिलरी क्लिंटन
जमेची बाजू
० राष्ट्राध्यक्ष निवडणूक अभियानातील अडचणी क्लिंटन यांच्याएवढ्या कोणालाही परिचित नाहीत. राष्ट्राध्यक्षपदाच्या जबाबदा-या चांगल्या प्रकारे माहीत आहेत.
० 2012 मध्ये दुस-यांदा निवडल्यानंतर ओबामांना श्वेत महिलांची मते गेल्या वेळेपेक्षा चार टक्के कमी मिळाली.
० अल्पसंख्याक मतांच्या बळावर ओबामा दुस-यांदा निवडून आले. 2016 मध्ये अल्पसंख्याक मतदार आणखी वाढतील. त्याचा डेमॉक्रेटिक पक्षाला फायदा होईल.
० स्थलांतर सुधारणा, मतदानाच्या हक्कासह अनेक मुद्द्यांवर रिपब्लिकन पार्टीत मतभेद आहेत.
० हिलरी यांना अल्पसंख्याक आणि महिलांची मते मिळतील. डेमॉक्रॅटिक समर्थक मतदारांमध्ये महिलाच अधिक आहेत.
उणिवा
० डेमॉक्रॅटिक पक्षाचा पुरोगामी गट परराष्ट्र धोरणांविषयीच्या हिलरी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे शंका घेऊ शकतो. त्यांना मोठ्या व्यावसायिकांचे समर्थक मानले जाते.
० अफगाणिस्तानात लष्करी कारवाई, लिबियावर बाँबफेक आणि अल कायदाचा म्होरक्या लादेनचा नि:पात करण्याच्या मोहिमेच्या त्या पूर्ण पाठीशी होत्या.
० डेमॉक्रॅटिक पार्टीतील मुत्सद्द्यांच्या मते रिपब्लिकन पार्टी हिलरींच्या दावेदारीला ओबामांसाठी तिस-या कार्यकाळाच्या रूपात सादर करतील.
० कामगारांमध्ये लोकप्रिय रिपब्लिकन गव्हर्नर क्रिस क्रिस्टी, जॉन केसिच, स्कॉट वॉकर यांचे हिलरींसमोर मोठे आव्हान आहे.