आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वजन घटवणार्‍या औषधांचे दावे भरपूर; पुरावे मात्र अल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वजन घटवणारी औषधे व डाएट (पूरक आहार) यांच्या परिणामांबाबत केल्या जाणार्‍या दाव्यांच्या खरेपणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकन फूड अ‍ॅण्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) वजन घटविणार्‍या अनेक सप्लिमेंट्स सुरक्षित असल्याबाबत साशंक आहे, पण कंपन्यांकडून ते परिणामकारक असल्याच्या केल्या जाणार्‍या दाव्यांबाबत फेडरल ट्रेड कमिशन तपास करीत आहे.

अमेरिकी सिनेटच्या अलीकडील सुनावणीत डाएट सप्लिमेंटच्या दाव्यांचा उल्लेख झाला होता. वैज्ञानिक पुराव्यांअभावी अशा काही गोळ्या या वजन कमी करणार्‍या चमत्कारी गोळ्या असल्याचा दावा करणार्‍या डॉ. मेहमत ओज यांना खासदारांनी अनेक प्रश्न केले. एफडीएने बेल्विग व क्यूसिमियासारख्या वजन घटविणार्‍या औषधांना तर मंजुरी दिलेली आहे; मात्र सप्लिमेंट्सना नाही.अमेरिकेत 2013 मध्ये सादर विधेयकात कंपन्यांना उत्पादने एफडीएमध्ये नोंदवून व त्यांच्या प्रभावाची माहिती देण्याची अट आहे. सिनेटच्या समितीकडे हे विधेयक आहे.

काही डाएट सप्लिमेंट्सचे दावे व त्यांच्या वैज्ञानिक स्थितीबाबची माहिती...

गामा लिनोलिक अ‍ॅसिड, डीएनपी, फॅट बर्नर्स
दावा - हे चरबी घटवतात व मांसपेशींना बळकटी देतात.
विज्ञान - याबाबत अपुरे पुरावे आहेत की, यामुळे वजन कमी होते.
जोखीम - शरीराचे काही अवयव निकामी होण्याच्या शक्यतेमुळे एफडीएने यापैकी काहींवर प्रतिबंध लादला आहे. मात्र, त्या ऑनलाइन उपलब्ध आहेत.

अकाई बैरी, व्हे, हुडिया, बिटर ऑरेंज
दावा - गोळ्या व पावडर सेवनामुळे पोट भरल्यासारखे वाटेल. जेवण कमी कराल.
विज्ञान - याच्या प्रभावाबाबत पूरक ठरणारे अल्प निरीक्षण नोंदवले गेले आहे.
जोखीम - यांचे बारकाईने अध्ययन केलेले नसल्याने त्यांच्या दुष्परिणामाबाबत पुरेशी माहिती नाही.

गवार गम, हायड्रोक्सीसाइट्रेट, फॅट ब्लॉकर्स
दावा - आपले शरीर जेवणाद्वारे मिळणारी अतिरिक्त चरबी ग्रहण करणार नाही.
विज्ञान - असे ठोस पुरावे नाहीत की, अशी आहारपद्धती परिणामकारक ठरेल.
जोखीम - यातील काहींमुळे डायरिया होऊ शकतो. यात व्हिटॅमिन ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. शैल फिशपासून बनलेल्या काही औषधांमुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते.

चिटोसैन, लेप्टिन, मैटाबॉलिम बुस्टर
दावा - हे फॅट आणि कॅलरी खर्च करण्यामध्ये सहायक आहेत.
विज्ञान - यांच्यामुळे शरीरातील कोशिका अधिक ऊर्जेचा उपयोग करू शकतात.
जोखीम- काही औषधांमुळे हृदयाची धडधड व गती आणि रक्तदाब वाढतो. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रकारही घडलेले आहेत.