आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रेकफास्ट सिरियल्सचे स्नॅक्स बनवायचे तर हे करून पाहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या लोक आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. जास्त वजन असलेले लोक ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर कमी वजनाचे लोक वजन वाढवण्याच्या मागे आहेत. सामान्य वजनाचे लोक ते न वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपण जे पदार्थ खातो त्याचा शरीरावर प्रभाव पडतो. अनेकदा लोक ब्रेकफास्ट सिरियल्स (धान्यापासून तयार केलेले रेडी टू इट फूड, कॉर्नफ्लेक्स..इत्यादी) नाष्ट्याप्रमाणे सेवन करतात. हे पदार्थ रेडी टू इट असल्यामुळे दिवसभरात कधीही खाता येतात. याच्या पाकिटांवर पोषक तत्त्वे किंवा कॅलरीजचे प्रमाण लिहिलेले असते. ती पोषकतत्त्वे शरीराला मिळतात, मात्र चरबी वाढण्याची शक्यता नसते.

पॅकेज्ड फूड खाताना त्यातील पोषक तत्त्वे वाढवणारे पदार्थही त्यासोबत खावेत. उदा. बारीक चिरलेल्या भाज्या किंवा कडधान्यासोबत कॉर्नफ्लेक्स खाता येतील. टोमॅटो-कांद्यासोबत दही आणि पुदिन्याच्या चटणीसोबतही खाता येईल. गोड चव हवी असल्यास व्हीटफ्लेक्स दूध आणि फळांसोबत खाता येईल. हे डेझर्ट म्हणूनही खाता येईल. हे तयार करताना कॉर्नफ्लेक्सचा एक थर घ्या. त्यावर दह्यात चिरलेली फळे लावता येतील. त्यावर काही ड्राय फ्रूट लावा आणि थंड होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

बाजारात फोर्टिफाइड सिरियल्स उपलब्ध असतात. मात्र साखर, चॉकलेट किंवा इतर फ्लेवर असलेले सिरियल्स टाळा. साध्या सिरियल्सऐवजी कोंडायुक्त पदार्थ किंवा तांदूळ हा चांगला पर्याय आहे. नाष्ट्यात अर्धी वाटी सिरियल्स खाता येतात. हे जेवणात खायचे असल्यास दुप्पट प्रमाण घ्यावे लागेल. त्यात आणखी काही टाकल्यास ते जास्तच होईल. हे पॅकेज्ड फूड असले तरी पिझ्झा किंवा बर्गर मागवण्यापेक्षा हे खाता येईल. यामुळे शरीराला फार अपाय होणार नाही. चांगले आरोग्य लाभेल.

पूजा मुखिजा
सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ, मुंबई

(डेमो पिक)