आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या डिजिटल संपत्तीचा वारस कोण?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या लोक असे सामान खरेदी करण्यावर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत आहेत, ज्यांना ते कधी हातही लावू शकत नाहीत. मागील वर्षी 240 अब्ज रुपयांचे ई-पुस्तक विकत घेतले गेले. केवळ संगणक किंवा क्लाउडवर उपलब्ध संगीत, चित्रपट आणि इतर साहित्य खरेदीवर अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचे हजारो फायदे आहेत, परंतु याच्याशी काही प्रश्नही निगडित आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे, तुम्ही ज्या वस्तूंची खरेदी कराल, तुमच्या मृत्यूनंतर त्यांचे काय होईल?

कायदा तयार करणा-यांनी या समस्येवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढल्याने अशा स्वरूपाच्या कायद्याची अधिक गरज भासत आहे. छंदी आयट्यून युजर 2 लाख 66,500 रुपयांपर्यंत ट्यून आणि संगीत भांडार जमा करतात. पैशांशिवाय भावनात्मक चिंताही आहेच. मागील वर्षात जवळपास 6 लाख अमेरिकी फेसबुक युजर्सचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. परंतु त्यांचे फोटो, नोट्स, संदेश, व्हिडिओ आणि इतर डिजिटल आठवणींचे काय होणार? यांच्याशी निगडित नियम असे-तसेच आहेत.

कायदेशीर भाषेत ई-वस्तूंना डिजिटल संपत्ती संबोधले जाते. संकट निर्माण होते जेव्हा डिजिटल संपत्तीविषयी आपले विचार आणि सेवा पुरवणा-याशी केल्या गेलेल्या करारादरम्यान मतभेद होतात. असे लांब करार कुणीही वाचत नाही. याहू आणि अमेझॉनसारख्या सेवा पुरवणा-या कंपन्या नेहमीच सांगतात की, त्यांचे खाते अहस्तांतरणीय आहेत किंवा जे तुम्ही विकत घेता ते तांत्रिकदृष्ट्या विकता येणार नाही, केवळ खासगी उपयोगासाठी लायसन्सवर दिले आहे.

अमेरिकेत नवनियुक्त प्रतिनिधी या हायटेक भ्रमाला दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत. पाच राज्यांमध्ये असे कायदे आहेत, ज्याअंतर्गत काही डिजिटल संपत्तीपर्यंत मृतकांच्या वारसांना सहजपणे पोहोचणे शक्य करण्यात आले आहे. अशा प्रकारचे कायदे इतर राज्यांतही बनत आहेत. मृत्यूनंतरही युजरच्या गुप्ततेच्या उल्लंघनाविषयी सतर्क असणा-या फेसबुकने मजकूर जाहीर करण्याच्या मागणीला विरोध केला आहे. गुगलने मॅसाच्युसेट्समध्ये डिजिटल संपत्ती कायद्याविरोधात मोहीम छेडली आहे. नेब्रास्कात ‘डिजिटल एसेट बिल’वर काम करणा-या वकील केटी जुलकोस्कींच्या मते, यासंबंधीचे कोणताही पहिला खटला मनोरंजक असेल. हा विषय खरंच अस्पष्ट आहे. तरी डिजिटल संपत्तीला आपल्या नातेवाइकांसाठी सोडणे हा एक जटिल प्रश्न बनला आहे. जसे की कायद्याचे प्राध्यापक ग्रेग लास्तोका सांगतात, ज्याप्रमाणे आपण वास्तविक संपत्तीचे मालक आहोत त्याचप्रमाणे आपण डिजिटल संपत्तीचे स्वामी बनू शकणार नाहीत.