आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माणसं घडवणारा लेखक !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका छोट्याशा गावात दहावी झाल्यानंतर जेव्हा औरंगाबादमध्ये शिकायला आलो, तेव्हा शहरी वातावरण, इथली मुलं-मुली, झपका-भपका बघून एकदम घाबरल्यासारखं व्हायचं. या दुनियेत आपला निकाल लागणार नाही, हे मनातल्या मनात हजार वेळा निश्चित झालं. आपलं जे काही होईल ते गावाकडंच. या शहरी संस्कृतीमध्ये आपण उपरे. शंभर टक्के. अशा विमनस्क मन:स्थितीमध्ये असताना माझ्या काळे नावाच्या मित्राने एक पुस्तक दिलं. ‘फारच नाराज दिसतोस. हे खूप विनोदी पुस्तक आहे, तुला हसायला येईल. वाच जरा.’

ते पुस्तक होतं ‘कोसला’. लेखक श्री. भालचंद्र नेमाडे. जेव्हा मी ‘कोसला’ वाचायला सुरुवात केली तर माझा पांडुरंग सांगवीकर कधी झाला हे कळलेच नाही. हळूहळू मी ती कादंबरी वाचत होतो. काळे अधूनमधून यायचा आणि म्हणायचा, ‘आहे का नाही मजा?’ पण जेव्हा त्याने माझ्या डोळ्यातलं पाणी बघितलं तेव्हा तो थोडा अस्वस्थ झाला. आयुष्यातल्या एका अतिशय नाजूक वळणावर असताना ‘कोसला’ ने मला जगण्याचं बळ दिलं. एका पुस्तकामध्ये इतकी ताकद असू शकते, हे त्या वेळी कळलं. नंतर इंग्रजी साहित्यात शिकायचं ठरवलं. सरस्वती भुवन महाविद्यालय व पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. येथे नेमाडे सरांनी शिकवलेलं होतं. इथला मित्रांचा ग्रुप वेगळा. इथं लक्षात आलं की आपली पिढीच ‘कोसला’ने भारावलेली आहे. ‘कोसला’ ने जगण्याचं बळ दिलेलं आहे.
दिलीप लाठी
लेखक व प्रकाशक, पुणे