आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Shanghvi, The Man Behind Sun's Shine News In Divya Marathi

उधारीच्या 10 हजारांवर सुरुवात, आज 24 हजार कोटींची उलाढाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिलीप संघवी / जन्म : 1 ऑक्टोबर 1955, मुंबई
शिक्षण : कोलकाता विद्यापीठातून कॉमर्स ग्रॅज्युएट
कुटुंब : पत्नी व्यवसायाने औषध विक्रेता आहे. मुलगा आलोक संघवी हा सन फार्मा कंपनीत इंटरनॅशनल मार्केटिंग सांभाळतो आणि सोलर पॅनल बनवणारी कंपनी पीव्ही पॉवरटेकचा सहसंस्थापक आहे. मुलगी विधीने अमेरिकेत व्हॉर्टन विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे.
चर्चेचे कारण : त्यांच्या सन फार्मा या कंपनीने 20 हजार कोटी रुपयांत रॅनबॅक्सी कंपनी खरेदी केली अहे. सन फार्मा ही जेनरिक औषध विकणारी जगातील पाचव्या क्रमांकाची कंपनी आहे.


तरुणपणी दिलीप संघवी यांनी भावी पत्नीला खुश करण्यासाठी म्हटले होते की, सगळे काही ठीक चालले तर काही वर्षांतच आपला बिझनेस एक कोटीच्या घरात जाईल. या वाक्याने विभा खूप प्रभावित झाल्या होत्या. आज संघवी यांची सन फार्मा आणि नुकतीच ताब्यात घेतलेली रॅनबॅक्सी या दोन्ही कंपन्यांची वार्षिक उलाढाल 24 हजार कोटींच्या आसपास आहे. संघवी यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1983 मध्ये सन फार्मा स्थापन करण्यासाठी त्यांनी वडिलांकडून दहा हजार रुपये उधार घेतले होते. आज दिलीप यांचा बहुतांश वेळ जगभरातील औषधांवरील संशोधने आणि बिझनेसमध्ये येणार्‍या बदलांनुसार स्वत:ला अपडेट करण्यात जातो. त्यांचे स्पर्धक आणि मित्रही याबाबतीत त्यांना मानतात. ते प्रयोगशाळेत असताना एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे संशोधकांशी चर्चा करतात. कोणत्या मिश्रणात काय घालावे, त्याचे प्रमाण किती असावे, कशामुळे औषधांची गुणवत्ता नष्ट होते, हेसुद्धा ते अतिशय तत्परतेने सांगतात.

पेटंटवर असलेली पकड, ही त्यांची दुसरी बळकट बाजू आहे. कोणत्या पेटंटच्या तोडीस तोड औषध बनवायचे, कुणाकडून जास्तीत जास्त कमवायचे, हे अमेरिकेतील कोर्टात प्रॅक्टिस करणार्‍या प्रोफेशनल्सपेक्षाही त्यांना जास्त माहीत आहे. त्यांनी कंपनीतील बरीच मोठी कामे आपल्या विश्वसनीय मित्रांवर सोपवली आहेत. ते स्वत: विज्ञान आणि व्यवसायासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी वेळ देतात. त्यांच्या अनेक वर्षांच्या अभ्यासामुळेच हा व्यावसायिक करार अंतिम टप्प्यापर्यंत यशस्वी करणे शक्य झाले.

युरोप, जपान आणि अमेरिकेत व्यवसाय विस्तारण्यासाठी 1997 मध्ये त्यांनी दुसर्‍या कंपन्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आजवर त्यांनी रॅनबॅक्सीसह 13 हून अधिक कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. सन फार्माचा उद्योग चारशे कोटींच्या घरात पोहोचवणार्‍या दिलीप यांना आता अमेरिकेतील सर्वात मोठी जेनेरिक औषधे बनवणारी कंपनी स्थापन करायची आहे. या योजनेअंतर्गतच रॅनबॅक्सी कं पनीचे विलीनीकरण झाले आहे.

आपल्या ध्येयाविषयी बोलताना दिलीप म्हणाले होते, स्पर्धा करण्यापेक्षा व्यवसायवृद्धीसाठी विविध मार्ग शोधणे हे माझे उद्दिष्ट आहे. कोणतीही वस्तू स्वस्तात खरेदी करून जास्त दराने विकण्यात त्यांना रुची नाही. आयुष्यातही त्यांनी हीच पद्धत वापरली आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणीवर त्यांचा विश्वास आहे.