आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disput: Waqaf Not Sanction Appointment Of Bukhari

वाद: बुखारींच्या नियुक्तीला वक्फकडून ५ वर्षे मंजुरी मिळाली नव्हती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांत चर्चेत आलेली ही तीन व्यक्तिमत्त्वे. यामध्ये दोन नेते व एक धार्मिक नेता आहे. ओडिशातील बिजद खासदार रामचंद्र हंसदा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली सीबीआयने अटक केली, तर मेघालयमधील मंत्री देबोरा सी. मारक यांच्याविरुद्ध दहशतवाद्यांची मदत घेतल्याच्या आरोपावरून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सय्यद इमाम बुखारी : शाही इमाम
- वय: ६३ वर्षे
- वडील : अब्दुल्ला बुखारी
चर्चेत : त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून सर्वात लहान मुलाच्या नावाची घोषणा केली आहे. या समारंभासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण दिले. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावले नाही. ते आपल्या वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत राहतात.
सय्यद बुखारी यांनी आपला सर्वांत लहान मुलगा शाबानला नायब इमाम म्हणून जाहीर केले असले तरी बुज-या स्वभावाचे शाबान यांची अद्याप त्यासाठी मन:स्थिती झाली नसल्याचे दिसत आहे. आपण राजकारणापासून दूर आहोत तसेच धार्मिक राजकारणातही रस नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शाबान यांचा कल मानवतेच्या कार्यात जास्त असल्यामुळे त्यांची या पदासाठी निवड झाल्याचे मानले जाते. याव्यतिरिक्त त्यांच्या धार्मिक विद्वतेलाही महत्त्वाचे स्थान आहे.
असे असले तरी २००० मध्ये शाबान यांचे वडील सय्यद बुखारी इमाम झाले होते, तेव्हा वक्फ बोर्डाने त्यांच्या नियुक्तीला पाच वर्षे मंजुरी दिली नव्हती. २००५ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले होते की, जामा मशीद वक्फची संपत्ती आहे आणि बुखारी वक्फच्या अधीन आहेत.
सत्तरच्या दशकात सय्यद यांचे वडील इमाम होते तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही वाहन नव्हते. या पार्श्वभूमीवर सय्यद इमाम बुखारी यांनी मोठी प्रगती केली आहे. जाकीर नगर, उर्दू बाजारमध्ये घरासोबत गजरौलामध्ये फार्म हाऊस आणि मेदिनामध्ये हॉटेल आहे. बुखारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्यांच्या नावावर चालते. त्यांच्याकडे कारचा ताफा आहे.

महत्त्व कशामुळे : १६५६ मध्ये शाहजहांने स्थापन केलेल्या जामा मशिदीच्या शाही इमाम यांनी शाबान यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शाहजहांने या मशिदीसाठी बुखाराहून(उजबेकिस्तान) इमामास बोलावले होते. त्या वेळी अब्दुल गफूर शाह बुखारी आले होते व आता शाबान याचे १४ वे इमाम होतील. मुस्लिमांसाठी याचे महत्त्व आहेच, मात्र आणीबाणीनंतर येथून राजकीय फतवे देण्यास सुरुवात झाल्याने ही मशीद विशेष चर्चेत राहिली. अनेक दिग्गज राजकीय नेते कृपा आशीर्वादासाठी या ठिकाणी येतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जामा मशिदीने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येते.
पुढे वाचा...