आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोट हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - घटस्फोटित व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा झटका बसण्याची शक्यता वैवाहिक संबंधात असणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त असते. १५,८२७ लोकांमध्ये करण्यात आलेल्या नव्या संशोधनात घटस्फोटित महिलांवर याचा सर्वाधिक परिणाम होत असल्याचे दिसून आले. दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या स्थितीत घटस्फोटित महिलांमध्ये हृदयविकाराचा धक्का बसण्याचा धोका क्वचित कमी होतो. विज्ञान मासिक सर्क्युलेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार घटस्फोटामुळे तणावाची समस्या निर्माण होते आणि शरीरावर त्याचा दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो.

हृदयविकाराच्या झटक्याची जोखीम
घटस्फोटाच्या प्रकरणात हृदयविकाराचा झटका बसण्याशी संबंधित मुद्द्यावर अधिक संशोधन करणे आवश्यक असल्याचे ब्रिटिश हार्ट फाउंडेशनने म्हटले आहे. ड्यूक विद्यापीठाचे एक पथकही घटस्फोट प्रकरणांच्या अभ्यासानंतर अशाच निष्कर्षाप्रत पोहोचले आहे. सन १९९२ ते २०१० दरम्यान करण्यात आलेल्या या संशोधनात तीन घटस्फोटित व्यक्तींमध्ये किमान एकाला असा धाेका असल्याचे दिसून आले.

हृदयाच्या सुरक्षेसाठी हे नियाेजन अावश्यक
बऱ्याचदा अशी वेळ येते की, जेव्हा हार्ट अटॅकचीच जास्त शक्यता असते. कुटुंबात जर असा इितहास असेल किंवा हृदयासंबंधी काही अाजार असतील, तर या काही गाेष्टींपासून सावध राहणे गरजेचे अाहे. जाणून घेऊया केव्हा असू शकते, हार्ट अटॅकची अधिक शंका अािण यापासून बचाव करण्यासाठी काेणत्या गाेष्टींची काळजी घ्यावी.
पहाट हाेण्यापूर्वी धाेका लक्ष लक्ष
हार्ट अटॅक अाणि कार्डियेक डेथ बहुधा सकाळी उठण्याच्या काही तास अगाेदर असते. हार्वर्डच्या संशाेधकांचे म्हणणे अाहे की, हार्ट अटॅकची शंका दिवसा ४० टक्के वाढलेली असते. कारण स्ट्रेस हॉर्मोन्सचे दिवसा तणाव अािण अाव्हानासाठी तयार हाेणे अाहे. झाेपताना रक्तदाब कमी हाेताे. सकाळी उठल्यावर ताे पुन्हा वाढून जाताे. साेबतच सकाळी डिहाइड्रेशन रक्त घट्ट करून टाकताे. ज्यामुळे पंप करणे अवघड हाेते. त्याचा परिणाम हृदयावर हाेताे.

हे करा
७ ते ८ तासांची झाेप घ्या. उठल्यानंतर स्वत:ला थाेडा वेळ द्या. एकदम व्यायामाला सुरुवात करू नका. वार्मअपसाठी वेळ द्या. पाणी प्या. हृदयासंबंधी काही अाैषधी सुरू असतील तर तज्ज्ञांशी बाेलून अाैषधी घेण्याची वेळ निश्चित करा. झाेपताना अाैषधाची याेग्य वेळ अाहे ज्यामुळे सकाळपर्यंत त्याचा परिणाम राहील.
सोमवारीच जास्त घटना
संशाेधन असे सांगते की, हार्ट अटॅक बहुधा साेमवारी येताे. याला नेहमी सप्ताहारंभाला येणाऱ्या मानसिक ताण तणावाला जाेडून पािहले जाते. याचे एक असेही कारण अाहे की, सप्ताहाच्या शेवटी झाेप पूर्ण हाेऊ शकत नाही, झाेप न झाल्यामुळे एड्रिनलिन एक्टिव्हिटीमध्ये वाढ हाेते.
हे करा
- सप्ताहाच्या शेवटी पुरेपूर झाेप घ्या. असे भाेजन करू नका की, ज्यामुळे हृदयाच्या नसांवर ताण पडेल.

जास्त कष्टाची कामेही कारण
अचानक खूप कष्टाची कामे हृदयावर दबाव टाकतात. व्यक्तीचे शरीर अशा प्रयत्नांना तयार नसते. ज्यामुळे अचानक रक्तदाब अािण स्ट्रेस हार्माेन्समध्ये वाढ हाेईल.
हे करा
राेज व्यायाम करा. हळूहळू क्षमता वाढवा. हृदयराेगी असाल तर काही करण्याअाधी अापल्या तज्ज्ञांना भेटून याेग्य सल्ला घ्या.
अतिसंताप करणे घातक
युरोपियन हार्ट जर्नल यांच्या म्हणण्यानुसार हार्ट अटॅकची शंका जास्त संताप केल्याच्या दाेन तासांच्या अात पाच पटीने जास्त हाेते. संताप करू नका. मानसाेपचार तज्ज्ञांशी सल्ला मसलत करा.
डॉ. जेपीएस सहानी, चेअरमन, कार्डियोलॉजी डिपार्टमेंट, सर गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली)