आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाही-लोकशाही खेळायचं का ? (दिव्य मराठी ब्लॉग)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनी - ए पिंटू, राजू , ढगळ्या, भातुकली खेळायची का ?

पिंटू - सोने, नको ती भातुकली! बोर झालं तेच-तेच खेळून ! ए आयडिया, आज
आपण लोकशाही-लोकशाही खेळायचं का ?

सोनु - लोकशाई म्हणजे काय रे दादा ? लोकांना शाई लावायची का रे
मतदानासाठी? जम्मतग नै !

सोनी - तू म्हणजे अगदीच लिंबू-टिंबू आहेस बघ अजून ! पिंटू , ग्रेट
आयडिया! ए पण मी होणार हं

madam ! आधी मी आईकडून लांब बाह्याचा ब्लाउज आणते कशी !

ढगळ्या - अगं तू बाई आहेसच. नवीन काय त्यात?

पिंटू - अरे तिला high-command व्हायचंय ! म्हणजे ती सांगेल ते आपण
सर्वांनी ऐकायचं !

ढगळ्या - पण ते तर आपण रोजच करतो की !

सोनी - अय्या आणि हे रे काय मोटू? तू असा पोळ्याच्या बैलासारख्या माळा का
घातल्यास ? केवढी जाडजाड lockets आहेत रे बाबा !

मोटू- अगं मी तनसे नगरसेवकाचा रोल करणार आहे ! आणि हा सोनू होईल
"सोनू-शेठ", युवा-पुढारी!

सोनु - मोटू-भाई, तुम आगे बढो ! हम तुम्हारा homework सम्भाल्ते हैं !

राजू - ते सगळं खरं , पण लोकशाही-लोकशाही म्हणजे स्कॅम-स्कॅम पण खेळणं
आलं! ते आपल्याला कसं जमणार बुवा ?

नरू - अरे सोप्पै राजू ! सुरेशने मागच्या वर्षी जोशीकाकुकडून २१ रुपये
गणपतीची वर्गणी म्हणून घेतले आणि आपल्याला ५ च दिले! १६ रुपयांची
chocolates एकट्यानं खाल्ली! तो तुरुंगातून निवडणुक लढवतोय असं खेळू या!

राजू - झकास ! आणि हा मोनू आपला तनमोहन ! तसाही हा नेहमीच सोनीचं सगळं
ऐकत असतो! आणि शिऱ्या , तू तोंड का असं वाकडं करून बसलायस अचानक ?

शिरीष - अरे मी हेमंत अवारांचा रोल करणार आहे. थोडी practice करतोय
भूमिकेत शिरायची!

पुढे वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...