आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाडगावकरांची "प्रेम म्हणजे प्रेम असतं"
कविता आमचे सर अगदी
तल्लीन होवून शिकवतात.
तुमचं अन आमचं सेSSम असतं
म्हणताना "ते" दिवस आठवून सरजी
कधी भावूक तर कधी लाले लाल होतात
लेकांनो अर्ध अर्ध चोकोलेट खाल्लं आहे का कधी?
पावसात सोबतीने भिजला आहेत का कधी?
अरे तुमच्या पिढीला बुडलेली होडी कळणार किशी?
लाटांवर बेभान होवून नाचणं शिका आधी
(अचानक मागच्या बाका कडे लक्ष जावून )
इकडे जीव तोडून प्रेम कविता मी शिकवतोय
अन हा बबन्या बाबी ला वर्गात चिठ्या पाठवतोय
अरे गाढवानो पाडगावकर तुम्हाला कळणार कधी?
शेमलेस लव्ह बर्डस गेट आऊट व्हा आधी!
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.