आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी अभियान: मातीचे गणपती, घरातच विसर्जन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षांत देशात, महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धनाबाबत सामान्य लाेकांमध्ये निश्चितपणे जागरूकता आली आहे. हे आपले उत्तरदायित्व आहे या जाणिवेतून उपक्रमही सुरू झाले. मात्र, हे पुरेसे  नाही. अजूनही अनेक ठिकाणी पर्यावरणाला बाधा निर्माण होत आहे. कित्येक जलाशयांचे प्रदूषण सुरूच आहे. या दृष्टीने सोबतचे हे छायाचित्र अत्यंत बोलके ठरते.

गणेशोत्सवाचा वारसा जगाला देणाऱ्या महाराष्ट्रासह देशभर या उत्सवाची तयारी सुरू आहे. यात गणेशाची मूर्ती हे पहिले आकर्षण असते. परंतु, या मूर्ती पीओपीच्या असतील तर विहिरी-तलावांमध्ये विसर्जनानंतर त्या विरघळत नाहीत आणि जलाशयांत प्रदूषण वाढते. शिवाय मूर्तींची विटंबनाही होते.
देशाचा विचार करता रायपूरच्या करबला तलावाचे हे छायाचित्र या दृष्टीने बोलके उदाहरण ठरते. उन्हाळ्यात या तलावातील पाणी कमी होत गेले तशा गेल्या सप्टेंबरमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती ८ महिन्यांनीही तशाच होत्या. यावरून अंदाज बांधता येईल की देशातील असे कितीतरी तलाव, विहिरी, जलाशये कसे प्रदूषित होत आहेत. ज्या आस्थेने आपण श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करतो, मूर्तीचे विसर्जन करतो त्याचा परिणाम काय होत आहे, याची जाणीव यातून होते.

महाराष्ट्रात मातीचे गणपती आणि प्रदूषणाबाबत जागरूकता अाली असली तरी प्रत्येक घरी मातीच्याच श्रीगणेश  मूर्ती असाव्यात म्हणून सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. म्हणूनच दैनिक भास्कर समूहाच्या ‘दैनिक दिव्य मराठी’च्या वतीने काही वर्षांपासून ‘मातीचा गणपती, घरातच विसर्जन’ हे अभियान राबवले जात आहे. प्रदूषणापासून जलाशयांचे संरक्षण हाच प्रमुख उद्देश आहे. बाप्पांचा आशीर्वाद कायम राहावा म्हणून घरातच मूर्तीचे विसर्जन करा. नंतर ती पवित्र माती कुंडीत टाकून रोपटे लावले तर बाप्पांचा आशीर्वाद आणि कृपादृष्टीही वर्षानुवर्षे घर-अंगणात कायम राहील. ही रोपटी मोठी होऊन पर्यावरणासाठी लाभदायीच ठरतील.
 
भास्कर समूहाच्या ‘दिव्य मराठी’ची नम्र विनंती आहे की, या वर्षी मातीच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करा आणि त्याचे विसर्जन घरातच करा. मुलांनी घडवलेल्या गणेशमूर्तींची  निवडक छायाचित्रे गणेशोत्सवादरम्यान दैनिक भास्कर व दिव्य मराठीत प्रसिद्ध केली जातील. उर्वरित छायाचित्रे DainikBhaskar.com वर अपलोड केली जातील.
 
ट्युटोरियल व्हिडिओ  -
घरातच मातीच्या गणेशमूर्ती घडवण्याचा ट्युटाेरियल व्हिडिओ दैनिक भास्करने तयार केला आहे. तो 7030001040 नंबरवर मिस्ड कॉल देऊन मिळवता येईल. तसेच https://goo.gl/UMj5Ez या लिंकवरही उपलब्ध आहे.
म्हणूनच या वेळी
मातीचे गणपती, घरातच विसर्जन
या विनम्र आग्रहासह
भास्कर परिवार
 
बातम्या आणखी आहेत...