आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा फक्त दिवाळी नाही, सार्थक दिवाळीचा संकल्प करूया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीचा आनंद सगळीकडे दिसू लागला आहे. बाजार असो की घर, किंवा इतर ठिकाण. सणाचा उत्साह कोपऱ्याकोपऱ्यात जात आहे. आपण सर्व आपापल्या घरात या सणाचे प्रकाशाने स्वागत करू. पण अनेक घरे अशी आहेत जेथे हा प्रकाश पोहोचू शकत नाही. अशा लोकांच्या घरांत प्रकाश पोहोचवण्यासाठी ‘दैनिक दिव्य मराठी’ने सार्थक दिवाळी अभियान सुरू केले आहे.

दिवाळीचा अर्थच आहे आनंद. आपण आपल्या एखाद्या छोट्या प्रयत्नाने इतरांच्या चेहऱ्यावर छोटेसे स्मितहास्य आणू शकलो तर आपला आनंद द्विगुणित होईल. त्यासाठी फार मोठे काम करण्याची गरज नाही. छोट्या छोट्या वस्तूंद्वारे आपण भेट म्हणून मोठा आनंद देऊ शकतो. उदा. आपण आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी नवे कपडे खरेदी करत असलो तर आसपासच्या गरजू मुलांसाठीही एक-दोन कपडे का खरेदी करू नये? हजारो रुपयांचे फटाके खरेदी करताना काही रुपयांचे फटाके या मुलांसाठीही घ्यावेत. आपल्यासाठी मिठाई आणली तर एक छोटेसे पॅकेट खरेदी करून त्यांना द्यावे. जेव्हा तुम्ही या वस्तू त्यांना द्याल तेव्हा पाहा, त्यांच्या चेहऱ्यावरही तुम्हाला आनंद जाणवेल. तुम्हाला त्या क्षणी जो आनंद मिळेल तो दिवाळीच्या रोषणाईपेक्षा जास्त प्रकाशमान असेल.

सार्थक दिवाळी अभियान ‘दैनिक दिव्य मराठी’ची हीच भावना व्यक्त करते. या भावना व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोणही ‘दिव्य मराठी’सोबत आली आहे. दीपिका म्हणते,‘नवे कपडे, मिठाई आणि संपूर्ण घरात दिवे; दरवर्षी हेच चित्र असते. मग या वर्षी या सणाला वेगळे का करू नये? दु:खी होऊन बसलेली मुले, कुटुंबापर्यंत मिठाई, चॉकलेट, दिवे, नवे कपडे पोहोचवून आपण फक्त दिवाळी नव्हे, सार्थक दिवाळी साजरी करूया. इतरांच्या नव्हे; आपल्या आनंदासाठी हे करा. व्हिडिओ पाहण्यासाठी यू ट्यूबवर टाइप करा dainikbhaskar.

- दिव्य मराठी परिवार