आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : ‘देवदास’ची 100 वर्षे : या भूमिकेचे वैशिष्ट्य काय आहे हे सांगतोय शाहरुख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
३० जून १९१७ ला शरतचंद्र चट्टोपाध्याय यांची ‘देवदास’ही कादंबरी प्रकाशित झाली होती. ती प्रकाशित व्हावी, अशी त्यांची इच्छा नव्हती. ‘देवदास छापण्यास देऊ नका, तसा विचारही करू नका, ते अनैतिक आहे. त्यात एक वेश्या आणि आणखीही बरेच आहे,’ असे पत्र त्यांनी एका मित्राला लिहिले होते. तरीही ती छापली गेली. त्या कथेवर आतापर्यंत जवळपास १६ चित्रपट बनले आहेत. देवदासच्या भूमिकेत प्रत्येक टप्प्याला आकर्षित करणारे काय आहे, हे सांगत आहे ही भूमिका करणारा शाहरुख खान.
 
मी दिलीपसाहेबांचा देवदास चित्रपट पाहिला होता, तेव्हा मी खूप लहान होतो. जेव्हा संजयने(लीला भन्साळी) मला कथा सांगितली तेव्ही मी ती जवळपास विसरूनच गेलो होतो. एक-दोन किरकोळ दृश्ये आठवत होती. तो या काळातील नव्हे, खूप आधीचा सुंदर चित्रपट होता. आम्ही जेव्हा चित्रपट सुरू केला तेव्हा मी कुठलाही देवदास पाहणार नाही, हे मी विशेषत्वाने निश्चित केले आणि मी पाहिलाही नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, आम्ही चित्रीकरण पूर्ण केले आणि त्यानंतर दिलीपसाहेबांचा आशीर्वाद घेण्यास गेलो तेव्हा त्याच दिवशी डिंपल चित्रपटगृहात त्यांचा देवदास पाहिला होता. म्हणजे माझ्या चित्रपटाचे चित्रीकरण संपवल्यानंतर पाहिला होता. मी कादंबरी पूर्ण वाचली होती. माझा देवदास आणि इतरांचाही, पुस्तकातील पात्रांच्या जवळपासचाच आहे. फक्त आमच्या चित्रपटात नाट्यमयता जास्त होती. आधीच्या कुठल्याही देवदासमध्ये चंद्रमुखी आणि पारो परस्परांना भेटल्या असतील असे मला वाटत नाही. बाकी कथा जवळपास एकसमान आहे.  
 
मला देवदासच्या भूमिकेत जे विशेष गुण दिसले त्यात तो मद्यपी असणे हा नव्हता. बहुतांश लोक त्याला मद्यपीच्या रूपातच पाहतात. पण पुस्तक वाचल्यानंतर मला असे वाटले की, बहुधा देवदास इतर बहुतांश पुरुषांप्रमाणेच कमिटमेंट फोबिक (वचन पूर्ण करण्यास घाबरणारे) आहे. मद्यपी किंवा दुसरा काही नाही. तो इतरांवर खूप प्रेम करणारा होता. खूपच संवेदनशील. कुटुंबात वडिलांशी त्याचे पटत नव्हते. ‘मी एवढ्या वर्षांपासून त्याला ओळखते, पण हा लग्न करण्यास घाबरत आहे,’ असे एखादी मुलगी म्हणत असल्याचे आपण अनेकांकडून ऐकतो. मला असे वाटते की, देवदासला कमिटमेंट फोबियाही त्याच्या कौटुंबिक परिस्थितीमुळेच असावा. ही कादंबरी आजही प्रासंगिक आहे आणि तेच तिचे वैशिष्ट्य आहे, असे मला वाटते. प्रत्येक पिढी ती कादंबरी वाचून आपल्या दृष्टिकोनातून कथा मांडू इच्छिते. तुम्ही देवदासला एक समाजवादीही म्हणू शकता. तुम्ही स्वातंत्र्याच्या आधीचा काळही तीत पाहू शकता. वडील-मुलाची कथा म्हणूनही तुम्ही तिच्याकडे पाहू शकता. एका मद्यपी माणसाची कथाही म्हणू शकता. तिचे आधुनिक रूप ‘देव-डी’ही तयार झाले. माझ्या मते तर ही कादंबरी आता मोनालिसाच्या गूढ हास्याप्रमाणे आहे. तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून ती पाहू शकता. ती फक्त दु:ख किंवा आनंदाचीच कथा नाही. बहुधा त्यामुळेच तिच्यावर अनेक चित्रपट तयार झाले आहेत.  
 
देवदासमध्ये आत्यंतिक संवेदनशीलता आहे. उदाहरणार्थ पारो येऊन त्याला म्हणते की, दारू पिणे बंद कर, तेव्हा देवदास म्हणतो की, तू तुझ्या पतीला सोड. ती म्हणते- ते शक्य नाही, मी पतीला सोडू शकत नाही. तेव्हा देवदास म्हणतो की, मग मला सांगू नको, आपण आताच पळून जाऊ. ती येणार नाही हे त्याला माहीत आहे, पण हे तो तिला दुखावण्यासाठी म्हणतो. माझ्या मते, ज्या मुलीवर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करता, तिलाच तुम्ही जास्त दुखवता. हीच गोष्ट मुलींनाही लागू आहे. ही बाब माझ्याबाबतही लागू आहे.  
 
खरे सांगायचे तर मी एकच चित्रपट संवादासाठी साइन केला, तो म्हणजे देवदास. चित्रीकरणाच्या वेळी मी म्हटले की, ‘कौन कम्बख्त बर्दाश्त करने के लिए पीता है,’ हा संवाद मला एकाच शॉटमध्ये करायचा आहे. तेव्हा संजयने दोन-तीन कॅमेरे लावले. पण काही मेणबत्त्या विझून गेल्या. तेव्हा ते म्हणाले की, शॉट खूप चांगला झाला, पण तो पुन्हा एकदा करू शकतोस का, कारण मेणबत्त्या विझल्या होत्या. आमच्यापैकी सर्वात जास्त श्रम संजयने घेतले होते. मला त्यातील सर्वाधिक आवडलेला एक संवाद आहे तो म्हणजे ‘अपने हिस्से की जिंदगी हम जी चुके चुन्नी बाबू, अब तो सांसो का हिसाब...’ आणखी एक संवाद आहे, जेव्हा पारो देवदाससोबत पळून जाण्यास तयार होत नाही तेव्हा मी तिला ‘दुष्ट’ म्हणतो. या दृश्यासाठी मला अनेक टेक करावे लागले होते. एक दृश्य आहे, ज्यात खूप चांगल्या ओळी होत्या- ‘ बडे-बडे गहने, बडी-बडी हवेली, बडे-बडे घर, बडे-बडे बच्चे.’ या ओळी खूपच दुखावणाऱ्या होत्या. एखादा दुखावलेला माणूस म्हणेल अशा त्या ओळी होत्या आणि मी तसा पुरुष नाही. मला ते लेखन आश्चर्यकारक वाटत होते आणि चित्तवेधकही.  
 
देवदासचे जग माझे जग कधीच नव्हते. तशा प्रकारचा चित्रपट मी आधी कधीच केला नव्हता. त्यामुळे मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. देवदासचे पात्र खूपच सखोल विचार करायला लावणारे आहे. मी हा चित्रपट करू शकतो असा विचार एखाद्याने करणे हीच माझ्यासाठी मोठी बाब होती. मी हा चित्रपट फक्त ३० सेकंदांत साइन केला होता. संजयने त्याआधीही मला ही कथा सांगितली होती, पण माझ्याकडे तारखा नव्हत्या. त्यामुळे प्रस्ताव पुढे सरकत नव्हता. करणने (जौहर) मला फोन केला आणि मी संजयला जाऊन भेटतो, असे मला सांगितले. कारण संजयला ज्या तारखा हव्या होत्या, त्याच तारखांना माझे चित्रीकरण होते आणि सेटही लागलेला होता. त्या दिवशी आमच्या तिघांच्या बैठकीत संजय मला म्हणाला की, शाहरुख, तुझे डोळे जसे आहेत, तसेच डोळे देवदासचे आहेत. जर तू हा चित्रपट केला नाही तर मी हा चित्रपटच तयार करणार नाही. दुसऱ्या कोणाचे डोळे मला तसे दिसत नाहीत.  
 
मला आठवते, जेव्हा हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात खूप भव्यपणे दाखवला गेला होता, तेव्हा एवढा भव्य चित्रपट आपण येथे आणू शकलो याचा अभिमान मला वाटला. मी देवदासच्या आधी आणि नंतरही मद्यपीची भूमिका केली नाही. मला मद्यपानाचे व्यसनही नाही. त्यामुळे ही भूमिका कशी करायची हे मला माहीत नव्हते. देवदास दिवसा दारू पीत असल्याची अनेक दृश्ये चित्रपटात आहेत. त्यासाठी मी खरोखर मद्यपान केले. मला आठवते, किरण खेर खूप डिस्टर्ब झाल्या होत्या. आम्ही दुपारी दोन वाजता हे दृश्य चित्रित केले होते. बहुधा किरण यांना माझ्या श्वासातून दारूचा गंध आला असावा. त्यानंतर त्यांनी ‘याला काय झाले आहे, तो तर दिवसाही मद्यपान करत आहे,’ असे माझ्या घरी फोन करून विचारले. किरण आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. आम्ही रविवारी यश चोप्रा यांच्या घरी क्रिकेट खेळायला जात असू. मी तेथे गेलो तर त्यांनी सर्वांना ही गोष्ट सांगितली होती. हे सर्व चित्रपटासाठी केले आहे हे मी त्यांना समजावले. पण त्या म्हणाल्या, नाही, तू दुपारी दारू प्यायला होतास. बऱ्याच वेळानंतर सर्वांनी माझे म्हणणे अखेर मान्य केले. चित्रपटासाठी मी अशा काही गोष्टी केल्या होत्या.  
 
जॅकी दादासोबत ‘शीशे से शीशा टकराए’ हे गाणे करण्याचा निर्णय अंतिम क्षणी झाला होता. आम्ही चित्रीकरण करू लागलो तेव्हा पाऊस सुरू झाला होता. मग आम्ही त्याचा सेट आत लावला, बाहेर नाही. आम्ही दोन रात्रींत त्याचे चित्रीकरण पूर्ण केले. एका घोटात पूर्ण बाटली प्यावी लागली, असे एक दृश्य त्यात होते. त्यानंतर आम्ही दोघे बाथरूममध्ये पळालो होतो. एका श्वासातच पूर्ण बाटली प्यावी लागेल, हे संजयने आधीच स्पष्ट केले होते. ते शक्य नाही, असे दादा आणि मी म्हटलेही होते. पण दृश्य बदलले नाही. आम्हाला एकाच श्वासात पूर्ण बाटली प्यावी लागली. ते खूपच कठीण होते.  तसे तर मी ‘अंजाम’ चित्रपटात माझ्या नायिकेला मारले होते, पण पारोच्या डोक्यावर जखम होते, असे रोमँटिक चित्रपटात पहिल्यांदाच झाले होते.  मी तिच्या डोक्यात सिंदूर भरतो असे ते दृश्य होते. मला ते दृश्य खूप भीतिदायक आणि वेगळेच वाटले. एखाद्या मुलीला दुखावण्याची कल्पना मी स्वप्नातही करू शकत नाही. आम्ही त्या दृश्यावर खूप काम केले. त्यानंतर ओढाताणीत देवदासला खूप राग येतो आणि त्यातच पारोच्या डोक्यावर हारामुळे जखम होते, असे ठरवण्यात आले. हे दृश्य करतानाही मला खूप वाईट वाटले होते.
 
शब्दांकन : सलोनी अरोरा
बातम्या आणखी आहेत...