आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारीरिक दुर्बलता विसरत चित्रपटांत काम; आता स्वत: चित्रपट बनवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्या अरोरा : सेरेब्रल पाल्सी पीडित अभिनेत्री व लेखिका
जन्म : दिल्लीत जन्म, 36 वर्षीय.
शिक्षण : दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये शिक्षण. सायकॉलॉजी, वर्ल्ड सिनेमा, फ्रेंचमध्ये डबल एमए.
चर्चेचे कारण : ‘प्यार अ‍ॅक्च्युली’या चित्रपटाची कथा लिहिली असून लवकरच चित्रपट सुरू होत आहे.

इतर सर्व मुलांप्रमाणेच दिव्या यांचे बालपण सुरू होते. पण वयाच्या साडेतीन वर्षांनंतर तिचे जीवन बदलले. सेरेब्रल पाल्सी आजार झाला. बुद्ध्यांक इतर मुलांसारखाच होता त्यामुळे शिक्षण सुरू ठेवले. लेडी श्रीराम महाविद्यालयात शिक्षण घेताना नाटके लिहिली आणि सादरीकरणही केले. ‘मेलडी ऑफ लाइफ’मध्ये टॉम अल्टर आणि आरजे मंत्रा यांच्याबरोबर काम केले. पाच वर्षांपासून आहेत.

80 च्या दशकातील ‘शिवा का इन्साफ’ चित्रपटात बालकलाकार व 2011 मध्ये अनुराग कश्यप यांच्या ‘शैतान’ या चित्रपटात त्या झळकल्या. आता स्वत: चित्रपट निर्मितीत उतरणार आहेत. त्यासाठी कथाही लिहिली आहे. दिव्या म्हणते, मी वयाच्या तिसर्‍या वर्षापासून व्हीलचेअरवर आहे. पण मला दु:ख नाही. धैर्य आणि इच्छाशक्तीची साथ मला आहे. लहानपणापासूनच शारीरिक दुर्बलतेला बाजूला सारत त्या उत्साहाने जीवन जगल्या. प्रत्येक कामात अग्रस्थानी राहण्याची त्यांची इच्छा असते. ‘गुजारीश’ चित्रपटासाठी त्यांनी हृतिकला आजारपणाचे प्रशिक्षण दिले होते. हृतिक गुणी विद्यार्थी असल्याचे त्या म्हणतात. शूटिंगच्या वेळी हृतिक पूर्णवेळ त्यांच्याबरोबर असायचा. माझी बोलण्याची पद्धत, हावभाव याचे निरीक्षण करून तो कॅमेर्‍यासमोर सादरीकरण करायचा. संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर 2009 मध्ये त्यांची भेट झाली होती. भन्साळी यांनी आपला चित्रपट बनवावा अशी त्यांची इच्छा होती. तीव्र इच्छाशक्तीमुळेच त्यांनी नोव्हेंबर 2013 मध्ये झालेल्या मिस इंडिया व्हील चेअर कॉन्टेस्टमध्ये फर्स्ट रनरअपपर्यंत बाजी मारली होती.