आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीत्व हीच तुझी शक्ती!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाच्या इतिहासात स्त्रीचा दुर्दम्य आशावाद आणि परिस्थितीशी झुंजण्याच्या अजोड बळाच्या जोरावर ती सर्वांना पुरून उरली. प्रत्येक क्षेत्रात महिला धाडसाने पुढे येत आहेत. धीटपणे व्यक्त होत आहेत. मग तो मंदिर-दर्ग्यातील प्रवेशाचा सामाजिक अधिकाराचा प्रश्न असो, दारूबंदीसारखा धगधगता विषय असो वा निर्भया-कोपर्डीसारख्या महिला असुरक्षिततेचा.

भारतात जागतिक महिला दिनाच्या किती तरी शतके आधी स्त्रियांना देण्यात अालेल्या सामाजिक श्रेष्ठत्वाचा दर्जा विविध सणांमधून प्रतीत होताे. मातृदिन, प्रेमाचे प्रतीक असलेला पाडवा, ममत्वाची भाऊबीज यांसारख्या सणांमधून स्त्रीला मान मिळतच अाला आहे. घरातील स्त्री ही महत्त्वाची आहे, याची जाणीव छोट्या-छोट्या गोष्टींमधून दिली जात होती. समाजमनसुद्धा सजग होते. स्त्रीच्या मर्यादेची जाणीव या समाजासह स्त्रीलाही होतीच. पण त्याचबरोबर तिचे सुप्त गुणही ते ओळखून होते. 

जसजसे समाज जीवन बदलत गेले, तसे अनेक गृहितके बदलत गेली. जडणघडण बदलत गेली आणि भावना बोथट होत गेल्या. हे फक्त पुरुषांच्या बाबतीतच नाही, तर स्त्रियांच्या बाबतीतही घडले अाणि स्वत:ची अभिव्यक्तीच हरवून बसली. 

पुन्हा तिला मूळ प्रवाहात आणण्यासाठी हरवलेली लेखणी, गमावलेला आत्मसन्मान, चाचपडणाऱ्या दिशा शोधण्यासाठी कोणते दिव्य पार पाडावे लागले, हे सगळे आपल्याला माहीत आहे. अन्यायाचा कडेलोट झाल्यावर पेटून उठली ती स्त्रीच. स्वत:च्या कर्तृत्वाची जाणीव होऊन गगनभरारीचे स्वप्न प्रत्यक्षात आणले ते ही स्त्रीनेच. जगाच्या इतिहासात स्त्रीचा दुर्दम्य आशावाद आणि परिस्थितीशी झुंजण्याच्या अजोड बळाच्या जोरावर ती सर्वांना पुरून उरली. प्रत्येक क्षेत्रात महिला धाडसाने पुढे येत आहेत. धीटपणे व्यक्त होत आहेत. मग तो मंदिर-दर्ग्यातील प्रवेशाचा सामाजिक अधिकाराचा प्रश्न असो, दारूबंदीसारखा धगधगता विषय असो वा निर्भया-कोपर्डीसारख्या महिला असुरक्षिततेचा. या मुद्द्यांवर सगळे समाजमन ढवळून निघाले. मोर्चे, आंदोलने, सभा या सगळ्यांची दखल सरकार दरबारी घ्यावीच लागली. 

प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांंदा लावून स्त्री उभी आहे. आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला शिकली आहे. तिच्या गुणांना, मतांना घरात आणि समाजातही किंमत आहे. विविध क्षेत्रे तिने पादक्रांत केली. स्त्रीची सुरक्षितता हा जरी नाजूक मुद्दा असला तरी आत्मविश्वासाने आज ती व्यक्त होत आहे. भारताचा अविभाज्य घटक असलेले खेडे मात्र यात दोन पावले मागेच आहे. सामाजिक संस्था, सरकार जरी या सगळ्या बदलांसाठी अग्रक्रमाने काम करत असले तरी परिस्थिती बदलायला वेळ लागेल. शहर आणि खेडे अशी तुलना केली तर अत्याचाराची, अन्यायाची रूपे फक्त बदलली आहेत. खेड्यातील स्त्री घरात अडकली आहे.

शहरात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रीसुद्धा सुरक्षित नाही. आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच आलेले स्वतंत्र विचार, मान-अपमानाच्या कल्पना, शिक्षण, नोकरी या सगळ्यांमुळे झालेली स्वत्वाची जाणीव, उशिरा होणारी मुलींची लग्ने आणि कुठेही तडजोड न करण्याची वृत्ती यामुळे कुटुंब व्यवस्थेवर दूरगामी घातक परिणाम होत आहेत.  एक स्त्री म्हणून सांगावेसे वाटते, सखे भानावर ये, तू खूप कष्टाने मिळवले आहेस गं आजचे स्थान! खूप काही गमावलेस हे मिळवण्यासाठी! तुझ्यातील संवेदनशीलता, सहनशीलता बोथट होऊ देऊ नकोस. आत्मसन्मान अाणि आत्ममग्नता यामधील पुसट रेषा वेळीच ओळख. हवे ते साध्य करण्याची शक्ती तुझ्यात आहे. या शक्तीचा योग्य ताे जागर अाणि वापर कर!!
बातम्या आणखी आहेत...