आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : पारंपरिक व्यवसायाला पर्याय समाधानकारक!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किस्सा 1: काेइम्बतूर विद्यापीठाच्या डाॅ. माया महाजन यांनी शेतातील विदेशी तणाच्या अाक्रमणावर सन २००० मध्ये संशाेधन करीत असताना ते दक्षिण अमेरिकी मूळ असलेल्या लँटाना कॅमारा या प्रजातीचे गवत असल्याचे त्यांना अाढळले. विविध वन क्षेत्रावरील विशेषत: पश्चिम घाटातील वन संपत्तीला धाेका निर्माण करण्याची त्याची क्षमता अभ्यासात निदर्शनास अाली. हे तण नष्ट करण्यासाठी रसायनांचा वापर केला तर देशी वनसंपदेचेदेखील नुकसान हाेण्याची शंका हाेती. हे विदेशी तण बांबूसारखे दिसते अाणि त्यापेक्षाही अधिक टिकाऊ अाहे. त्यामुळे या तणाचा वापर फर्निचरसाठी करण्याचा विचार त्यांच्या मनात अाला. परंतु त्यांच्याकडे अर्थसाहाय्य नव्हते, व्यवसायाचे काही नियाेजनदेखील नव्हते. जेव्हा त्या अमृता विद्यापीठात सेंटर फाॅर सस्टेनेबल फ्यूचरमध्ये सहयाेगी प्राध्यापिका नियुक्त झाल्या तेव्हा त्यांनी या लँटाना कॅमारा तणावर प्रकल्प अहवाल लिहिला. त्यात अादिवासींना अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचे साधन उपलब्ध हाेईल अाणि स्थानिक वनसंपदेला धोका पाेहाेचणार नाही, असेही त्यात प्रकर्षाने नमूद केले. अखेर २०१५ मध्ये प्रकल्पाला अाैपचारिक रूप मिळाले. मात्र वन विभागाची परवानगी अाणि स्थानिक लाेकांना प्रशिक्षित करण्यात बराच काळ लागला. त्यानंतर मात्र अल्पखर्ची फर्निचर, हस्तकलेच्या वस्तू, खेळणी अादी उपयाेगी वस्तूंची निर्मिती सुरू झाली. अाज भलेही हा व्यवसाय बाळसे धरत असला तरी गावकऱ्यांनी अातापर्यंत लाख रुपये किमतीच्या फर्निचरची विक्री केली. अजून ५० टक्के अाॅर्डर पूर्ण व्हावयाची अाहे. 

किस्सा 2: ‘पेपरशेपर’ कार्डबाेर्ड बनवणाऱ्या कंपनीचे मुंबईतील उद्याेजक हरेश मेहता यांनी २०१० मध्ये अापल्या मुलाची ‘ग्रीन वेडिंग’ केली. त्यांनी स्टेजवरील पारंपरिक वेल्वेट काऊचएेवजी कार्डबाेर्डचे फर्निचर ठेवले. १०० पेक्षा अधिक खुर्च्या, टेबल अाणि सजावटीचे लॅम्पदेखील कार्डबाेर्डचे बनवलेले हाेते. या पाहुण्यांना अापण कार्डबाेर्डच्या खुर्चीवर बसलाे अाहाेत यावर विश्वासच बसत नव्हता. विवाहास अालेले पाहुणे इतके प्रभावित झाले की त्यांनी तीनच दिवसांत फॅक्टरीतील फर्निचर खरेदी केले. त्याच काळात ‘काळा घाेडा फेस्टिव्हल’मध्ये त्यांनी राॅकिंग चेअर प्रदर्शित केली. अातापर्यंत त्यावर ३० हजारपेक्षाही अधिक लाेक बसले असावेत अाता ती त्यांच्या केबिनमध्ये अाहे. हरेशचे वडील जया पॅकेजिंग नावाने व्यवसाय करीत हाेते. ताे १५ वर्षांपूर्वी बंद पडला. मात्र ‘पेपर शेपर’ साकार करण्याचा निर्णय त्यांनी कुटुंबीयांच्या मदतीशिवाय घेतला. कठाेर मेहनतीने हे स्वप्न साकार केले. त्यांनी अवघ्या ते १२ हजार रुपये किमतीच्या दरम्यान झाेके, खुर्च्या, टेबल, स्टूल, सिंगल बेड, साेफा सेट, अादी वस्तू बनवल्या अाहेत. पेपर शेपरच्या ‘स्वत:च बनवा’ फर्निचरमध्ये त्याचे सुटे भाग स्वतंत्रपणे ठेवता येतात. त्यामुळे जागा अडत नाही. दर पाच वर्षांनी त्यावर पुनर्प्रक्रिया करता येते. त्यांच्या पॅकेजिंग डिझाइनने कॅमलिन, हिंदुस्तान युनिलिव्हर, पी अँड जी, फिलिप्स, बजाज, रेेमंड, जिनी अँड जाॅयसारख्या ब्रँडचा विश्वास संपादन केला अाहे. 

फंडा असा : पारंपरिक व्यवसायाला पर्याय शाेधण्यासाठी अापण निराळ्या ढंगाने विचार करताे, त्यातूनच अागळा अानंद मिळताे. त्यामुळे व्यवसाय दीर्घकाळ चालताे. 

एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...