आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : भावी पिढीसाठी नवे देणे हादेखील उत्सवच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टोरी 1: ऑगस्ट महिन्यात पुण्याच्या कोथरूडमध्ये ऑटोकॅड सॉफ्टवेअर इंजिनिअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवणारा रणजित नाईक आणि विमाननगर परिसरातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक असलेल्या नेहा या दांपत्याला मुलगी झाली होती. मुलीचे नामकरण करण्यासाठी मोठा सोहळा करण्याचे नियोजन या कुटुंबाने केले. मात्र मुलीच्या आईवडिलांच्या डोक्यात एक वेगळाच विचार सुरू होता. यावलजवळच्या भुलेश्वर मंदिराच्या परिसरात या दांपत्याने १०१ झाडे लावण्याचे नियोजन केले. मुलीच्या नामकरणाच्या सोहळ्यावर होणारा खर्च टाळून त्या खर्चात ही झाडे जगवण्याचे नियोजन करण्यात आले. 

पुण्यापासून ५५ किलोमीटर अंतरावर भुलेश्वर मंदिराच्या परिसरात संपूर्ण नाईक कुटुंबीय गेले. ठरल्याप्रमाणे गावकरीही त्यांच्या या उपक्रमात सहभागी झाले होते. सगळ्यांनी मिळून नुसते वृक्षारोपणच केले नाही, तर झाडांना व्यवस्थित संरक्षणही देण्यात आले. लाकडे आणि लोखंडी जाळीचे संरक्षण देऊन ही झाडे जगवण्याची संपूर्ण सुरक्षा करण्यात आली. झाडांना पाणी घालण्यासाठी ग्रामस्थांची टीमही तयार करण्यात आली. एवढेच नाही, तर गावातील शाळेलाही ५१ झाडे भेट देण्यात आली त्या विद्यार्थ्यांकडूनही झाडे जगवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन घेण्यात आले. या कार्यक्रमातच मुलीचे‘अलीशा’ असे नाव ठेवण्यात आले. 

स्टोरी 2 : सौम्याकवीने अॅमेझॉनमध्ये आपल्या इंजिनिअरच्या नोकरीचा राजीनामा देत एक सोशल सेक्टर कन्सल्टन्सी फर्म सुरू केली. हैदराबादमधील गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील असे काम करण्याचा त्याचा प्रयत्न होता. जेव्हा त्याने या मुलांबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मुलांच्या अनेक समस्या समजल्या. घरची परिस्थिती, मोठ्या भावाबहिणीचे शिक्षण अशा प्रत्येकाच्या कुटुंबातील अनेक समस्या त्याला समजल्या. त्याने या समस्या ऐकल्यावर मनातील हीच खदखद नाटकाच्या रूपाने सादर करण्याचे मुलांना सांगितले. १०-१२ मिनिटांत आपल्या मनातील खदखद विद्यार्थ्यांनी मोठ्या हिमतीने स्टेजवर मांडली. तिसरीच्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वर्णमालाही येत नव्हती त्यांनी स्टेजवर स्वत: लिहिलेली नाटिका सादर केली. 

सौम्याचा मित्र प्रशांत नोरीही आपल्या वर्गातील मुलांना शिकवण्यासाठी नाटकाचा उपयोग करत होता. २०१५ मध्ये या दोघांनी मिळून ‘ड्रामेबाज’ नावाचा ग्रुप तयार केला. त्यानुसार तीसरी ते सहावीचे विद्यार्थी नाटक सादर करू लागले. डिझाइन वर्कशॉपपासून, पटकथा लेखन, दिग्दर्शन, रिहर्सल आदी सगळी काम हे विद्यार्थीच करू लागले. आज त्यांचा ड्रामेबाज ग्रुप देशातील पाच शहरांमध्ये काम करत आहे. जवळपास दोन ते तीन हजार विद्यार्थी त्यात शिकत आहेत. 
 
- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...