आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केविनच्या संगतीत वनराज सुरक्षित!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण अाफ्रिकेतील प्रिटाेरियाचे अभयारण्य जेवढे सिंहांसाठी बहुचर्चित ठरले अाहे, तितकेच केविन रिचर्डसन (४२) देखील चर्चेत अाले अाहेत. ते सिंहाची भाषा जाणतात, त्यांचे हावभाव समजू शकतात. अर्थातच या बाबीची सुरुवात तितकीशी साेपी नव्हती, परंतु केविनच्या अाई बँकेत, तर वडील अाैषध कंपनीत नाेकरीवर हाेते. केविन १३ वर्षांचे असताना पितृछत्र हरवले. १६ व्या वर्षी स्टॅन श्मिट यांच्याशी त्यांची गाठ पडली अाणि ‘बिहेवियरिस्ट’ बनले.
 
 महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचे शिक्षण त्यांच्यासाठी टर्निंग पाॅइंट ठरले. वन्यजीवांसाठी काम करणे हे त्यांचे करिअर नव्हे तर छंद असल्याची जाणीव त्यांना झाली. फिजिअाेलाॅजी अाणि अॅनाटाॅमीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एक्सरसाइज फिजियाेलाॅजिस्ट बनले. २३ व्या वर्षी त्यांनी घराजवळील पार्कमध्ये सिंहाच्या दाेन छाव्यांची देखभाल केली. 
 
-अाज रिचर्डसन १६०० एकरमधील लाॅयन पार्कमधील सिंहांची देखभाल करत अाहेत. ते म्हणतात, मी असताना असामान्य परिस्थितीत सिंहांचे प्राण जाऊ शकणार नाहीत, ना अाजारपणामुळे किंवा शिकाऱ्यांच्या गाेळीमुळे. 

-रिचर्डसन सिंहांच्या एकूणच संख्येबाबत सचिंत अाहेत. ते म्हणाले, अाफ्रिकेत १५ वर्षांपूर्वी सिंहांची संख्या सुमारे ३.५ लाख हाेती, ती अाता अवघ्या २० हजारांवर येऊन ठेपली अाहे. अाम्ही येणाऱ्या पिढीसाठी वारसा म्हणून काय ठेवून जात अाहाेत? 
 
बातम्या आणखी आहेत...