आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ट्विटर’साठी कसे माॅडेल हवे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्राे ब्लाॅगिंग साइट ट्विटरला प्रदीर्घ काळ अशी काही प्रतिष्ठा मिळाली की, बहुतेक कंपन्यांसाठी जणू ते स्वप्न ठरावे. राजकारणी, काॅर्पाेरेट बाॅस, सामाजिक कार्यकर्ते अाणि नागरिक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट पाहण्यासाठी या प्लॅटफाॅर्मवर लक्ष ठेवून असतात. ९ फेब्रुवारीला कंपनीचा अार्थिक अाढावा सादर करताना मुख्य कार्यकारी प्रमुख जॅक डाेर्सी म्हणाले हाेते, सारे जग ट्विटर पाहत अाहे, खरे तर अापली प्रशंसा करताना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काही नव्हते. 
 
ट्विटरच्या उत्पन्नात घट हाेत चालली अाहे अाणि १११७ काेटी रुपयांपेक्षाही अधिक ताेटा झालेला अाहे. युजर्सची संख्यादेखील वाढत अाहे. ज्या काळात फेसबुकचे ७ काेटी २० लाख युजर्स वाढले त्याच काळात ट्विटरचे केवळ २० लाख युजर्स वाढले. हे खरे की, ट्विटर हे ३१ काेटी ९० लाख युजर्ससाठी सार्वजनिक अाणि राजकीय संवादाच्या महत्त्वपूर्ण सेवेचे माध्यम बनले अाहे.
 
 
मध्यपूर्व अाणि अमेरिकेतील ब्लॅकलाइव्हज मॅटर अांदाेलनांमध्येे महत्त्वाची भूमिका बजावली अाहे. परंतु या प्लॅटफाॅर्मची प्रकृती ही निराळ्या स्वरूपाची असल्यामुळे भरपूर पैसा कमावणे कठीणच अाहे. टि्वटर संदेशांसाेबत जाहिराती जाेडल्या, तर युजर्स संख्या अापाेअापच कमी हाेऊ लागेल. 
 
ट्विटर हे एक सामान्य जनतेचे व्यासपीठ बनले अाहे. म्हणूनच त्याच्या व्यवस्थापनाने व्यवसायापेक्षाही सार्वजनिक हिताच्या संदर्भात अधिक विचार केला पाहिजे. मेसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट अाॅफ टेक्नाॅलाॅजीतील शिक्षक साशा काेस्टांजा चाेक म्हणाले, टि्वटरमुळे युजर्सना असे फिचर्स मिळू शकतात जे शाेषण अाणि हेट स्पीचसारख्या विखारी घटकांपासून बचाव करू शकतील. 
 
नजीकच्या काळात ट्विटर सहकारी संस्था बनण्याची शक्यता तशी कमी अाहे. भांडवली बाजारात ८०० अब्जांपेक्षाही त्याचे अधिक मूल्य अाहे.
बातम्या आणखी आहेत...